पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव
                    * न्यायलयाच्या निर्णयाविरोधात शिक्षण उपसंचालकांकडे दाद मागणार असल्याचा गायकवाड यांचा दावा खोटा *

गार्डी येथील हनुमान लोकसेवा मंडळ संचलीत विद्यामंदीर हायस्कुल गार्डी या शाळेच्या मुख्याध्यापक पदासाठी संस्थेच्या अधिकाप्राप्त विश्‍वस्तांनी शिक्षणाधिकारी सोलापूर यांच्याकडे रा.म.साठे यांचा प्रस्ताव दाखल केला होता.याबाबत जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांनी सार्वजनिकन्यास नोंदणी कार्यालयाकडे संपर्क करुन अधिकारप्राप्त विश्‍वस्तांची परिशिष्ट 1 ची नक्कल प्राप्त  करुनच रा.म.साठे यांना मुख्याध्यापक पदाचा पदभार घेण्याचे आदेश दिले होते.व याबाबत  शाळा न्यायाधिकरणाचे आदेशही होते.असे असताना संस्थेचे तथाकथीत अध्यक्ष असल्याचा दावा करून दत्तात्रय गायकवाड हे दिशाभूल करीत आहेत.वास्तविक पाहता त्यांचा या संस्थेशी काहीही संबध नाही व शिक्षण सस्थेच्या घटनेनुसार वारसा हक्क प्रस्थापीत करता येत नाही असे असतानाही दत्तात्रय गायकवाड हे अनाधिकाराने दिशाभूल करणारे प्रत्रके प्रसिध्दीस देत असून शिक्षण उपसंचालकांकडे दाद मागण्याचा त्यांना कुठलाही कायदेशीर अधिकार नसतानाही ते अशा प्रकारचा फोल दावा करीत आहेत अशी माहीती या संस्थेचे उपाध्यक्ष संपत लक्ष्मण जाधव यांनी प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
        या बाबत अधिक माहीती देताना या संस्थेचे उपाध्यक्ष संपत जाधव यांनी रा.म.साठे यांच्यावर केलेल्या आरोपाचे खंडण करताना साठे सर यांना चार अपत्ये असल्याचा आरोप करणार्‍यांनी यापुर्वी त्यांना सहकार्य करण्याचे धोरण राबवीले होते.साठे सर यांना सप्टेंबर 2005 पुर्वीची चार अपत्ये असून या पैकी एकावेळी त्यांना जुळे अपत्य झाले आहे.केवळ संस्थेस नाहक बदनाम करुन व अनाधिकाराने तक्रारी करुन व बदनामीचे षडयंत्र रचुन रा.म.साठे यांच्यासह संस्थेच्या विश्‍वस्तांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे असलेल्या संस्थेच्या कागदपत्रांची शहनिशा केल्यानंतर तथ्य समोर येईलच तेव्हा दत्तात्रय गायकवाड यांनी केलेल्या फोल दाव्यास योग्य प्रतिउत्तर देणे क्रमप्राप्त झालेने आम्ही हे पत्र पसिध्दीस देत असल्याचे संस्थेचे पदसिध्द उपाध्यक्ष संपत लक्ष्मण जाधव यांनी यावेळी सांगीतले. 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी