हिंदुस्थान हा फक्त हिंदू धर्मीय लोकांचा देश नाही तर इतर धर्मीय लोकांचाही देश


इंदूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी इंदूरमधील एका महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना हिंदुस्थान हा फक्त हिंदू धर्मीय लोकांचा देश नाही तर इतर धर्मीय लोकांचाही देश आहे. ज्याप्रमाणे जर्मन लोकांचा देश जर्मनी आहे, ब्रिटिशांचा देश ब्रिटन आहे, अमेरिकन नागरिकांचा देश अमेरिका त्याचप्रमाणे हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे. पण हा देश फक्त हिंदूंचा नाही तर इतर धर्मीयांचाही असल्याचे वक्तव्य केले आहे.
देशाला महान कुठलाही एक नेता किंवा एक पक्ष बनवू शकत नाही, तर त्यासाठी समाजाचे मोठे योगदान असावे लागते, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे. पूर्वी लोक काहीही समस्या जाणवू लागल्यावर देवाकडे साकडे घालायचे किंवा देवाला दोष द्यायचे. पण सध्या कलियुग आहे त्यावेळी सरकारला दोष लोक देतात. पण सरकारला जेव्हा समाजाची योग्य साथ मिळते तेव्हाच सरकारला लोकांच्या समस्या निवारण्याचे काम योग्यपणे करता येते, असेही भागवत यांनी म्हटले आहे. जगातील महासत्ता होण्याची क्षमता भारतामध्ये आहे. महासत्ता व्हायचे असेल तर जनतेला आपल्या डोक्यातून आणि मनातून भेदभाव हा शब्द कायमचा खोडून टाकावा लागेल, असेही मोहन भागवत यांनी यावेळी म्हटले आहे.

Popular posts from this blog

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव