आपलं पंढरपूर:- पंढरपूर शहर तालुक्यातील संस्थांची नोंदणी रद्द करण्याबाबत 18 डिसेंबरला सुणावनी पहील्या टप्प्यात 29 संस्था : आपलं पंढरपूरने प्रकाशित केले होते विशेष आर्टीकल
पंढरीत मठ,मंदिरे व संस्था यांची मोठी रेलचेल असून या सार्वजनिक संस्थांच्या कारभारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी धर्मदाय सह.आयुक्त कार्यलय सोलापूर यांची आहे.सोलापूर जिल्ह्यात सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेखाली नोंदणी झालेल्या संस्थांची सर्वाधिक संख्या पंढरपुर परिसरात आहे.सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे नोदणीकृत असलेल्या संस्थांच्या कारभारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी धर्मदाय आयुक्त कार्यालयाची असून संस्थांचे वार्षिक हिशोब पत्रके तपासणे,प्रोसेडींग बुक नियमित आहे की नाही याची खातरजमा करणे,संस्थेचे उत्पन्न,संस्थेच्या मालमत्तांपासून येणारे उत्पन्न याची माहीती योग्य प्रकारे नमूद करण्यात आली आहे की नाही याची खात्री करणे. संस्थेची जागा खरेदी अथवा भाडेकरारापोटी देण्यासाठी आवश्यक ती परवानगी घेतली आहे की नाही याची चौकशी करणे,विश्वस्त मयत झाले असतील तर त्या ठिकाणी नव्याने विश्वस्त नेमण्यासाठी संस्थांना बाध्य करणे,संस्थेने दाखल केलेले बदल अहवाल मंजूर करणे याची जबाबदारी धर्मदाय सह.आयुक्त कार्यालयाची आहे.मात्र अनेक संस्था केवळ कागोदपत्री अस्तित्वात असल्याबाबत आपलंं पंढरपूर व सा.पंढरी वार्ताने या बाबत एक विशेष आर्टिकल प्रकाशित केले होते.
धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून आता अशा केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या मृतप्राय संस्थावर कारवाईचा बडगा उगारत नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून यामध्ये पंढरपूर तालुक्यातील खालील 29 संस्थांचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.या संस्थांबाबत सुनावणी 18 डिसेंबर रोजी होणार असून त्यानंतर या संस्थांंची नोंदणी रद्द करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
यामध्ये 1) शिक्षण प्रसारक मंंडळ जैनवाडी2) महसुल कर्मचारी कल्याण संस्था3) अत्रीॠषी विश्वस्त मंडळ,तिसंगी4) शनी उपासक सेवा मंडळ पंढरपूर 5) श्रीनाथ क्रिडा व शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर 6) रमाबाई आंबेडकर महिला समाजसेवी संस्था पळशी 7) सौ.चंद्रकला पदमसिंह पाटील संस्था फुलचिंचोली 8) विठ्ठल पाणलोट विकास संस्था बाभुळगाव,9) ज्योतींलिंग शिक्षण प्रसारक मंडळ,पळशी,10)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला संस्था कोर्टी 11)लक्ष्मी विलास बहुद्देशीय संस्था पंढरपूर 12) सुशिक्षीत बेरोजगार युवक विकास संस्था पंढरपूर 13) स्वामी समर्थ बहुद्ेशीय संस्था पिराची कुरोली 14) प्रशांतराव परिचारक कला व शिक्षण युवक मंडळ खर्डी,15) पांडुरंग रुक्मिणी सामाजिक विकास संस्था पंढरपूर 16) भटक्या जाती जमाती निवासी आश्रम शाळा तावशी,17) श्रीनाथ सार्वजनिक वाचनालय फुलचिंचोली,18) शिवपार्वती महिला संस्था पंढरपूर,19) अभिनव विश्वस्त मंडळ गाताडे प्लॉट पंढरपूर 20)भैरवनाथ क्रिडा व सांस्कृतीक संस्था फुलचिंचोली 21) श्रीलोक महामंगल बहुद्देशीय संस्था गोपाळपूर 22) राजूबापू पाटील कला क्रिडा मंडळ उंबरगाव 23) जिजामाता वाचनालय भाळवणी 24) गोदाई सार्वजनिक वाचनालय पळशी 25) युवा शक्ती विकास संस्था शेळवे 26) शिवप्रेमी बहुद्देशीय संस्था पंढरपूर 27) ज्ञानप्रसाद वाचनालय कौठाळी 28) महर्षी वाल्मिकी बहुद्देशीय संस्था पंढरपूर 29) अहिल्या बहुद्देशीय मंडळ इसबावी
या संस्थाबाबत 18 डिसेंबर रोजी रोजी सुणावनी होणार असून त्यावेळी या संस्थांच्या विश्वस्तांना आपली बाजू मांडावी लागणार असून या संस्थांचे ऍडीट रिपोर्ट,बदल अहवाल आदींसह प्रोसेीडंग बूक नियमित तपासले असल्याबाबतही खुलासा सादर करावा लागणार आहे.