आपलं पंढरपूर :- कर्मवीर औदुंबर(आण्णा) पाटील यांच्या 94 व्या जयंती निमित्त गुरुवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन
*मोफत सर्वरोग निदा शिबीर,नेत्रतपासणी शिबीर व 2 डि.इको विभागाचा उदघाटन समारंभ *
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा.आमदार स्व.औदुंबर(आण्णा)पाटील यांच्या 94 व्या जयंती निमित्त कर्मवीर औदुंबररावजी पाटील चॅरीटेबल ट्रस्ट संचलीत विठ्ठल हॉस्पिटलच्या वतीने मोफत सर्वरोग निदान शिबीर,मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर व विठ्ठल हॉस्पिटल येथे 2-डि.इको विभाचा उदघाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष युवराज विलासराव पाटील यांनी दिली आहे.
येथील विठ्ठल हॉस्पिटलमध्ये गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक 10 वाजता आयोजीत या कार्यक्रमात स्व.औदुुंबर(आण्णा)पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन राष्ट्रवादी कॉगेे्रसचे जिल्हाध्यक्ष मा.आ.दिपक साळुंखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तर 2-डि.इको विभागाचा शुभारंभ राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मा.जि.प.अध्यक्ष बळीराम(काका)साठे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आमदार भारत भालके हे भुषविणार असून या कार्यक्रमास सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे,विठ्ठल कारखान्याचे व्हा.चेअरमन लक्ष्मण पवार,राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मोहन कोळेकर,विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक चंदूलाल शहा आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास सर्वांनी आवर्जुन उपस्थित रहावे व गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजीत सर्वरोग निदान व नेत्र तपासणी शिबीराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष युवराज पाटील व उपाध्यक्ष विलासराव साळुंखे सर यांनी केले आहे.