आपलं पंढरपूर :- गरीब रूग्णांसाठी विठ्ठल हॉस्पिटल संजिवनी ठरत आहे- आ. भारत भालके कर्मवीर स्व.औदुंबरआण्णांच्या 94 व्या जयंतीनिमित्त सर्वरोग निदान व नेत्रतपासणी शिबीर संपन्न

सामान्य कुटूंबातील रूग्णांना कमी खर्चात चांगले उपचार मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कर्मवीर औदुंबरआण्णा  पाटील यांनी विठ्ठल हॉस्पिटल उभे केले आणि आज सर्व प्रकारच्या अद्यावत मशनरी उपलब्ध करून जास्तीत जास्त चांगल्या पध्दतीने रूग्णांना सेवा देण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष युवराज पाटील व त्यांचे सर्व सहकारी प्रयत्न करीत असल्याने एक प्रकारे गरीब रूग्णांसाठी विठ्ठल हॉस्पिटल संजिवनी ठरत असल्याचे प्रतिपादन आ. भारत भालके यांनी केले. ते कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे, कार्याध्यक्ष बळीराम काका साठे, सह. शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार, संचालक मोहन कोळेकर, दिनकर पाटील, नारायण जाधव, दिनकर चव्हाण, दिनकर कदम, रामहरी रणदिवे, चंदुलाल शहा, विलासराव साळुंखे, शांतिनाथ बागल, पंढरी-भूषणचे संस्थापक शिवाजी शिंदे सर, मर्चन्ट बँकेचे चेअरमन  नागेश भोसले, रा. कॉं. शहराध्यक्ष सुधीर भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मा. आ. दिपकआबा साळुंखे यांच्या हस्ते कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच श्री विठ्ठल हॉस्पिटल मध्ये नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या 2-डीइको या विभागाचा शुभारंभ राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्याध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मोङ्गत नेत्र तपासणी व मोङ्गत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आ. भारत भालके पुढे म्हणाले की, सध्याच्या काळात डेंग्यु, चिकुनगुनिया, व्हायरल इनङ्गेक्शनच्या आजाराने अनेक नागरिक त्रस्त असून अशा रूग्णावर चांगल्या प्रकारे सेवा देत उपचार करून रूग्ण पूर्णपणे बरा होऊन हॉस्पिटल मधून बाहेर पडावा अशी अपेक्षा व्यक्त करीत शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून शासकीय योजना विठ्ठल हॉस्पिटलमध्ये कार्यान्वयीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत कर्मवीर आण्णांनी अनेक संस्था उभ्या करून चांगल्या पध्दतीने काटकसरीने चालवित राज्यात एक आदर्श निर्माण केला. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवराज पाटील व त्यांच्या सहकार्यांनी चांगल्या पध्दतीने हॉस्पिटल चालवावे अशी अपेक्षा व्यक्त करीत कर्मवीर आण्णांना अभिवादन केले.
प्रारंभी आपल्या स्वागत: व प्रास्ताविक भाषणात ट्रस्टचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी हॉस्पिटल सुरू करताना अलेल्या अडचणींना सामोरे जात सर्वांच्या सहकार्याने मार्ग काढीत हॉस्पिटल अद्यावत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगत हॉस्पिटलमध्ये आयसीयु, डायलेसिस, स्त्रीरोग विभाग, अपघात विभाग, आजपासून सुरू होत असलेल्या 2-डीईको विभाग, 24 तास सेवा देण्यासाठी कार्यारत असल्याचे पाटील यांनी सांगितले. कर्मवीर आण्णांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी व माझे सर्व सहकारी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.
 याप्रसंगी अभिजीत पाटील, ऍड. आनंतराव पाटील, शरद चव्हाण, रणजित पाटील, जिवराज चव्हाण, ऍड. भारत भोसले, हरिदादा घाडगे, लायन्स क्लबचे रा.पा. कटेकर, दिपक वाडदेकर, नगरसेवक महादेव भालेराव, बंदपट्टे, प्रशांत शिंदे, महादेव मस्के, महादेव खटके, मारूती जाधव, विलास देठे, संजयआप्पा भिंगे, लक्ष्मण वाघमोडे, संजय पाटील, डॉ. अमरसिंह जमदाडे, डॉ. बी.जी. लाड, डॉ. प्रमोद अभिवंत, मल्हारी पवार, रविंद्र पाटील, भारत शितोळे, मोहन पाटील, राजू उराडे व आण्णा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागटिळक सर व बोंगाळे सर यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार प्रविण भोसले यांनी मानले.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव