आपलं पंढरपूर :- वृक्षतोड परवान्याची यादी संकेत स्थळावर प्रसिध्द करा ! नगर विकास विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी केव्हा ?
शतकोटी वृक्ष लागवड योजनेसह विविध पर्यावरणपुरक योजनांच्या माध्यमातून राज्यशासन वृक्षारोपणासाठी कोटयावधी रुपयांचा निधी खर्च करण्याबरोबर अनेक नियमांचे काटेकोर पालन करुन वृक्ष संवर्धन करावे यासाठी शासनाच्या विविध विभागासह स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या माध्यमातून प्रयत्नशिल असतानाच अनेकवेळा वशिल्याने परवानगी घेवून तसेच बेकायदेशीरित्या वृक्षतोड होत असल्याचेही निदर्शनास येते.शहरी भागात विशेषत: नव्याने विकसीत होत असलेल्या नगर पालीका क्षेत्रात वृक्षतोडीचे प्रमाण खुप मोठे असल्याने वृक्षतोडी परवाने निर्गमीत करण्यासाठी एक विशेष कार्यपध्दती अवलंबण्याचे आदेश राज्याच्या नगर विकास विभागाने 23 मार्च 2016 रोजी दिले होते.
या आदेशानुसार महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संवर्धन व संरक्षण कायदा 1975 अनुसार अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर कलम 8(3)(अ)नुसार या अर्जाबाबत नगर परिषद प्रशासनाने निर्णय घ्यावयाचा आहे.मात्र या ही वृक्षतोड परवाना प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी नगर विकास विभागाने 23 मार्च 2016 रोजी दिलेल्या आदेशानुसार वृक्षतोड परवान्यासाठी प्राप्त अर्जाची माहीती दर सात दिवसाला पालीकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावी व त्रयस्थ व्यक्तीस यामध्ये पडताळणीची मुभा देण्यात यावी असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.या नुसार पंढरपूर नगर पालीकेने वृक्षतोड परवान्यासाठी प्राप्त अर्जांची संकेत स्थळावर प्रसिध्द करुन दर सात दिवसाला ही यादी अपडेट करणे गरजचे आहे.व याबाबत त्रयस्थ व्यक्तीची तक्रार असल्यास पडताळणी करण्यास मंजूरी द्यावी असे नमूद करण्यात आले आहे.मात्र नगर विकास विभागाच्या या आदेशाची अंमबजावणी पंढरपूर नगर पालीकेकडून केली जात नसून एकीकडे खाजगी ठेकेदारामार्फत शहरात जवळपास सव्वाकोटी रुपये खर्च करुन वृक्षलागवड केली जात असतानाच बेकायदेशीर रित्या वृक्षतोडीच्या घटना वारंवार समोर येत आहेत.त्यामुळे पंढरपूर नगर पालीका प्रशासन नगर विकास विभागाच्या आदेशाची अंमबजावणी करणार की इतर आदेशाप्रमाणे याही आदेशाला केराची टोपली दाखविणार असाच प्रश्न उपस्थित होत आहे.