आपलं पंढरपूर :- सदाभाऊची ‘संगत’ भाजपाला नडणार ? सदाभाऊंच्या डबलरोल मुळे व्यक्त होतोय प्रचंड संताप
ऊसदरासाठी सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार आणि उस उत्पादक शेतकरी यांच्यातील तीव्र संघर्ष सद्या इरेला पेटलेला असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या ऊसदर आंदोलनाबाबत चांगलीच आक्रमक भुमिका घेत सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना,प्रशासानाला व जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार मंत्री या देशमुख द्वयांना चांगलेच धारेवर धरले आहे.कुठल्याही दबावाला न जुमानता आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी सज्ज असलेल्या स्वाभिमानी शेेेतकरी संघटनेच्या जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणच्या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसून येत असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनापुढे जिल्ह्यातील साखर कारखानदार,पोलीस प्रशासन व जिल्हाप्रशासन अक्षरश: हतबल झालेले दिसून येत आहे.शेतकर्यांच्या या जिव्हाळयाच्या प्रश्नाबाबत राज्यात सत्तेवर असलेले भाजपा सरकार फोडा व झोडा या नितिचा अवलंब करीत असल्याची भावना ऊस उत्पादक शेतकर्यांमध्ये निर्माण झाली असून आमाणी काय ? आमाणंंी काय ? म्हणत थेट सत्तेचे सोपान चढून राज्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या ना.सदाभाऊ खोत यांना वश केले की शेतकरी आंदोलन सहज चिरडता येईल असा समज करुन घेतलेल्या भाजपाच्या अंगलट आता त्यांचाच डाव आला असून ना.सदाभाऊ खोत यांच्या ‘डबलरोल’ मुळे ऊस उत्पादक शेतकरी चांगलेच चिडले असल्याचे दिसून येत आहे.
सद्या सोलापूर जिल्ह्यात ऊसदर आंदोलनाचा चांगलाच भडका ऊडाला असून जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना,बळीराजा शेतकरी संघटना,जनहीत शेतकरी संघटना आंदोलनास अधिकाधिक उग्र स्वरुप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करुन ऊस उत्पादक शेतकर्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र त्याच वेळी सत्तेत राहुनही आपण ऊस उत्पादक शेतकर्यांचे कैवारी आहोत ही भुमिका वठवता येण्यासाठी ना.सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेचे बारसे केले व आपल्या काही मोजक्या कार्यकर्त्यांना यासाठी तैनात केले.मात्र आज सोलापूर जिल्ह्यात उग्र आंदोलन सुरु असताना स्वाभिमानी व बळीराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेे करो या मरो हा हेतू ठेवून आंदोलनास अधिक उग्र बनवत असताना रयत क्रांती संघटनेचा मात्र काही ठरावीक लोकांना हाताशी धरुन प्रसिध्दी करण्यापुरता आंदोलनाचा इव्हेंट सुरु असल्याचेच दिसून येत आहे.