आपलं पंढरपूर :-शिरढोणच्या सरपंचपदी उज्वला दत्तात्रय कांबळे यांची निवड

पंढरपूर तालुक्यातील शिरढोणच्या सरपंचपदी विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक व आ.भारत भालके यांचे कट्टर समर्थक दत्तात्रय कांबळे यांच्या सुविद्य पत्नी उज्वला दत्तात्रय कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीनंतर शिरढोण येथे त्यांचा भव्य सत्कार व मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी बोलताना उज्वला दत्तात्रय कांबळे म्हणाल्या की शिरढोण गावातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी आम्ही सामुहीक प्रयत्नाने यशस्वी करु तसेच गावातील महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्व महिलांशी संवाद साधून प्रयत्न करणार आहे.
यावेळी बोलताना दत्तात्रय कांबळे म्हणाले की,शिरोढोणच्या ग्रामस्थांनी सदैव आमच्यावर विश्‍वास दाखवीत विविध जबाबदार्‍या सोपविल्या आहेत आणि त्या आम्ही प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत.आज सोपविलेली ही जबाबदारीही प्रामाणिकपणे पार पाडू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव