आपलं पंढरपूर :- आ.राम कदमांनी मंदीर समितीला राम राम करावा ! नियुक्तीपासून एकदाही समितीच्या बैठकीस उपस्थिती नाही.
विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या नविन अध्यक्ष व सदस्यांची जुलै महिन्यात घोषणा झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिीणी मंदीर समितीचे नुतन अध्यक्ष अतूल भोसले यांनी धडाकेबाज कामकाज करण्यात सुरुवात केली असून समितीच्या वतीने मंदीराच्या,शहराच्या विकासासाठी अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले जात आहेत.समितीची दरमहिन्याला बैठक नियमितपणे पार पडत असून प्रत्येक बैठकीत नविन योजना,निर्णय व आवश्यक त्या कामांसाठी निविदा प्रक्रिया याबाबत चर्चा होत असतानाच या
समितीच्या बैठकीस समितीचे सदस्य असलेले आ.राम कदम हे उपस्थित रहात नसल्याचे दिसून येत आहे.
ऐन आषाढीच्या तोंडावर घाईगडबडीत मंदीर समितीची घोषणा करण्यात आली.त्यानंतर एकादशीच्या शासकिय महापुजेनंतर नुतन सदस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.या सत्कारावेळीदेखील भाजपाचे आमदार असलेले राम कदम हे अनुपस्थित होते.यावरुनच मंदीर समिती सदस्य म्हणून काम करण्यास आ.राम कदम इच्छुक नसल्याचीच चर्चा होत आहे.29 वर्षेे अस्थायी समितीच्या हाती मंदीर समितीची सुत्रे होती.सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर स्थायी व सर्वसमावेश मंदीर समिती अस्तित्वात आणण्याचा मार्ग मोकळा झाला व मंदीर सतिमीच्या माध्यमातून अनेक विकास योजनांसाठी निधी खर्च करण्यातील अडथळाही दूर झाला.त्यामुळे भाविकांकडून व शहरातील जनतेकडून शिर्डी व शेगाव प्रमाणे समितीच्या माध्यमातून भरीव कार्य केले जाईल अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसून येते.मंदीर समितीचे नुतन सदस्य संभाजीराजे शिंदे ,सचिन अधटराव हेतर पुर्णवेळ मंदीराशी संबधीत समस्या सोेडविण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते.तर समितीचे अध्यक्ष अतूल भोसले हे वारंवार पंढरपूरला भेट देवून प्रत्येक बाबींवर वैयकतीक लक्ष ठेवून असतात.
मंदीर समितीच्या सदस्यत्वासाठी एकीकडे वारकरी संघटनांनी ऐन आषाढी दशमी दिवशी पालखी सोहळा थांबवून समितीच्या सदस्यपदी वर्णी लावण्याचा आग्रह धरला असतानाच अचानकपणे मंदीर समिती सदस्यत्वाची लॉटरी लागलेले भाजपाचे आ.राम कदम हे विठ्ठलापासून दूर का असाच प्रश्न जनतेमधून विचारला जात आहे.
आ.राम कदम हे मंदीर समितीच्या बैठकीस सातत्याने गैरहजर रहात असल्याने त्यांची या समितीचा जबाबदार सदस्य म्हणून काम करण्याची इच्छा आणि पात्रता नाही त्यामुळे त्यांनी सरळ आपल्या पदाचा राजीनामा देवून सदस्यत्वाची जागा रिकामी करावी व दुसर्या एखाद्या विठ्ठल भक्ताला सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्यावी अन्यथा आम्हास त्यांच्या राजीनाम्यासाठी एखादे आंदोलन छेडावे लागेल असा इशारा शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंदे यांनी सा.पंढरी वार्ताशी बोलताना दिला आहे.