आपलं पंढरपूर :-अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर नियंत्रण ठेवणारी संगणक प्रणाली न.पा.केव्हा विकसीत करणार ? शासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणीची गरज

नगर पालीका क्षेत्रात सातत्याने अनधिकृत अतिक्रमणे व बांधकामे होत असल्याने याबाबत नागरिकांच्या प्रचंड तक्रारी प्राप्त होत असतात.अनेक वेळा राजकीय लागेबांधे व इतर कारणामुळे नगर पालीका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर व अतिक्रमणावर कारवाई करण्यास नगर पालीका प्रशासन कुचारई करीत असल्याचे निदर्शनास येते तर नागरिकांच्या तक्रारी नाकारण्याचे प्रमणाही खुप मोठे आहे.नगर पालीकेच्या बांधकाम विभागासह अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाईचे जुजबी नाटक पार पाडले जाते.तरीही शहरात मोठया मोठया प्रमाणात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे होताना आढळून येतात.सामान्य नागरिकांच्या दुकानासमोर ठेवलेला स्टूलही अतिक्रमणाच्या नावाखाली अतिक्रमण विरोधी पथकाच्या वाहनात टाकून नेला जातो मात्र त्याच वेळी इतर नगर पालीकेच्या मालकीच्या व खुल्या जागांवर मोठया प्रमाणात अतिक्रमण होत असताना नगर पालीका प्रशासन मुग गिळून कारवाई करण्याचे टाळत असल्याचे निदर्शनास येते.याची गंभीर दखल घेवून राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने 16 मे 2016 रोजी शहरातील अनिधकृत बांधकामे व अतिक्रमणे रोखण्यासाठी हाय रिझोल्युशन सॅटेलाईट फोटग्राफ प्रणालीद्वारे सॅटेलाई्रट इमेजच्या माध्यमातून माहीती प्राप्त करुन विशेष संगणक प्रणाली विकसीतकरुन त्या द्वारे दर सहा महिन्याला याचा आढावा घेवून अतिक्रमणावर व अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी असे आदेश शासनाने दिले होते.
                     पंढरपूर शहरात अनेकवेळ अतिक्रमण हटाव मोहीमा राबविण्यात आल्या आहेत.या मोहीमांच्या माध्यामातून शहररातील मोक्याच्या जागांवरील अनेक अतिक्रमणे काढून टाकण्यात आली होती.व यासाठी नगर पालीकेने मोठा खर्चही केला होता.मात्र तरीही पुन्हा त्याच ठिकाणी पुन्हा मोठया प्रमणात अतिक्रमणे होताना नगर पालीका प्रशासन कारवाई करणे तर दूरच विशेष संगणक प्रणालीच्या माध्यमातून याची माहीतीही संकलीत करण्यास हतबल ठरले असल्याचे दिसून येत आहे.तसेस नगर पालीकेच्या संकेत स्थळावर ही माहीतीही अपलोड केली जात नसल्याचे दिसून येत आहे.पालीकेचे संकेतस्थळ गेल्या अनेक महिन्यापासून अपडेटच केले गेले नसून याचा पासर्वडच पालीका प्रशासन विसरले आहे अशीही चर्चा होताना दिसून येत आहे.      

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव