आपलं पंढरपूर :- मायक्रो फायनान्स कडून कर्ज घेतलेले नसतानाही कर्जदाराच्या यादीत नाव ! कागदपत्राचा दुरुपयोग केल्याची महीलेची तक्रार

कर्जमागणीसाठी नवचैतन्य मायक्रो फायनान्सकडे दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन आपल्या परस्परच कर्ज काढले असल्याची तक्रार पंढरपूरातील एका महिलेने केली असून वयाच्या अटीमुळे तुमचे कर्जप्रकरण मंजूर होत नाही असे या महीलेस सांगण्यात आले होते.मात्र आता दुसर्‍या मायक्रो फायनान्सकडे सदर महीला कर्जकाढण्यासाठी गेली असता त्यांना आपण नवचेतन्य  मायक्रो फायनान्सचे कर्जदार आहात त्यामुळे आपणास कर्ज देता येत नाही असे सांगण्यात आले.
     यावेळी सदर महीलेने आपण नवचैतन्य फायनान्सचे कर्जच घेतले नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला असता या फायनान्सकडून बेबाकी दाखला आणा असे सांगण्यात आले.यानंतर सदर महीलेने इसबावी येथील या                   फायनान्सच्या कार्यालयात जावून जाब विचारला असता तुम्हाला काय करायचे ते करा असे उत्तर देण्यात आले त्यामुळे अखेर या महीलेने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे.व नवचैतन्य फायनान्सची या कर्जप्रकरणी चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव