आपलं पंढरपूर:- आ.भालकेंचा पाठपुरावा,ना.निलंगेकरांचे आश्वासन आणि कामगार आयुक्त कार्यालयाचा खोडा ! पंढरीत ‘कामगार कल्याण’कार्यालय केव्हा होणार ?
पंढरपूर शहर व आसपासच्या तालुक्यातील कामगार बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा,कामगार आयुक्त कार्यालय व कामगार कल्याण मंडळाच्या मायमातून राबविण्यात येणार्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी पंढरीत कामगार कल्याण मंडळाचे कार्यालय व्हावे अशी मागणी आ.भारत भालके यांनी राज्याचे कामगार मंत्री ना.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे केली होती.त्यावेळी आपण लवकरच पंढरपूर येथे विभागीय कामगार कल्याण मंडळाचे कार्यालय स्थापन करुन कामगारांना न्याय देण्याबरोबर त्यांना विविध शासकिय योजना व सवलती चा लाभ मिळावा यासाठी उपायोजना करू असे आश्वासन ना.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आ.भारत भालके यांना दिले होते.मात्र या त्यांच्या लेखी आश्वासनाची आजतागायत पुर्तता झाली नसून त्या मुळे अनेक कामगार विविध योजनांपासुन वंचीत रहात आहेत.
सोलापूर येथे कामगार कल्याण मंडळाचे व सह.कामगार अयुक्त कार्यालय आहे.मात्र खाजगी आस्थापना,सहकारी व खाजगी साखर कारखाने,विविध खाजगी उद्योग तसेच व्यापारी संस्था यामध्ये काम करणारे अनेक कामगार सोलापूरातील कार्यालयात गेल्यानंतर त्यांना माहीतीही दिली जात नसल्याचा अनुभव अनेक कामगारांना आला आहे.सोलापूररातील सहस्त्रार्जुन मंगल कार्यालयाच्या दुसर्या मजल्यावर सह.कामगार आयुक्त कार्यालय आहे तर सात रस्ता रंगभवन परिसरातील गरुड बिल्डींगच्या मागे कामगार न्यायालय व कामगार कल्याण मंडळाचे कार्यालय आहे. मात्र केवळ पुरेशा माहीती अभावी व या दोन्ही कार्यालयातील कर्मचार्यांच्या अनास्थेमुळे पंढरपूर सह शेजारच्या तालुक्यातील अनेक कामगार शासनाच्या योजनांपासून वंचीत रहात आहेत.आ.भारत भालके यांनी कामगार कल्याण मंडळाच्या पंढरपूर कार्यालयासाठी आपला पाठपुरावा सुुरच ठेवला असला तरी अजून तरी शासन दरबारी त्याची दखल घेतली जात नसल्याचेच दिसून येत आहे.