आपलं पंढरपूर :- डोळ्यात अश्रू आणि हातात मदतीचा धनादेश ! उपस्थितांचेही डोळे पाणावले !
चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्डयात बूडून मृत्यूमुखी पडलेल्या चार बालकांच्या कटुुंबास आज तहसिलदार मधूसुधन बर्गे यांच्याहस्ते शासकिय मदतीचे धनादेश देण्यात आले.हे धनादेश स्विकारताना या मयत बालकांच्या पित्याचे डोळ्यात अश्रू दाटून आले होते.आपली सोन्यासारखी चार बालके गमावलेल्या या कुटुुंबाचे झालेल्या वेदना,दुख हे कधीच शब्दात वर्णन करता येणार नाही.अतिशय गरीब अर्थिक परिस्थीती असलेल्या या कुुटूंबाना आज अखेर प्रत्येकी एक लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.
यावेळी भाजपाचे सरचिटणीस संजय वाईकर, गवळी समाजाचे राजाभाऊ शहापूरकर, बबुल बोराळकर, बाळासाहेब बळवंतराव, संदिप मुटकुळे, लखन ननवरे, विकी दंदाडे, श्रीकांत ननवरे, धीरज करकंबकर, गणेश अंकुशराव, दगडू कांबळे, रामचंद्र गोडसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.