आपलं पंढरपूर :- पंढरीतील पथविक्रेत्यांना ओळखपत्रे केव्हा मिळणार ? पंढरपूर नगर पालीका पथविक्रेता समिती कागदावरच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रखडलेल्या फेरीवाला धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेत राज्यातील लाखो फेरीवाल्यांना अधिकृत करण्याचा आणि त्यांना रोजगारासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे अडीच ते तीन लाख फेरीवाल्यांना होणार आहे. रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या व्यवसायाचे विनियमन करण्यासह त्यांना उपजीविकेचे
हक्क, सामाजिक सुरक्षा आणि पोषक वातावरण देण्यासाठी पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अशा प्रकारची व्याख्या करुन या कायद्यास डिसेंबर महिन्यात राज्यमंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.
या अधिनियमाच्या कलम 36 मधील तरतुदीनुसार प्रत्येक राज्याने फेरीवाल्यांसाठी नियम प्रसिध्द करणे आवश्यक असून त्याप्रमाणे राज्य सरकारने 3 ऑगस्ट 2016 रोजी नियम प्रसिध्द केले होते. या धोरणानुसार सहा महिन्यात फेरीवाल्यांचे अचूक सर्वेक्षण करून त्यांना पथविक्रेता म्हणून प्रमाणपत्र देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने पथविके्रता समिती स्थापन करून त्यांना ओळखपत्रे द्यावेत असे आदेश दिले होते. अपंग, विधवा आणि एकाकी माता यांनाही प्राधान्य द्यावे अशा सुचना देण्यात आल्या होत्या.एखाद्या वर्दळीच्या ठिकाणासाठी पथविक्रेते इच्छूक असल्यास सोडत पध्दतीने जागेचे वाटप करावे असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.पथविक्रेत्यांना देण्यात येणारे पथविक्रेता प्रमाणपत्र पाच वर्षासाठी वैध असणार आहे. तसेच ते हस्तांतरीत करता येणार नाही की भाड्याने देता येणार नाही. मात्र, काही विशिष्ट परिस्थितीत कायदेशीर वारसास ते हस्तांतरीत करता येईल.
प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात या अधिनियमानुसार नगर पथविक्रेता समिती स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिले होते.आरोग्य,स्वच्छता आणि सुरक्षा यासंदर्भातील कायदा किंवा नियमांमधील तरतुदींची पूर्तता करणार्या पथविक्रेत्यांना व्यवसायाच्या ठिकाणी परवाना द्यावा व यासाठी ङ्गेरीवाल्यंानी व पथविके्रत्यांना नगर पालीकेच्या माद्यमातून नियुक्त करण्यात आलेल्या पथविक्रेता समितीच्या माध्यमातून परवाने प्राप्त देणे गरजचे होते.पंढरपूर हे तिर्थक्षेत्र आहे.वारीच्या कालावधीत येथील अनेक युवक बांगडी,प्रासादिक वस्तु,स्टेशनरी साहित्य,प्लास्टिकच्या गृहोपयोगी वस्तु विक्रीचा व्यवसाय करीत असतात .त्यामुळे ही विशेष बाब लक्षात घेवुन पंढरपूर नगर पालीकेच्या पथविक्रेता समितीने तातडीने परवाने वाटप करणे गरजचे आहे.मात्र पंढरपूर नगर पालीकेने स्थापन केलेली पथविक्रेता समिती केवळ कागदावरच असून यामध्ये समाविष्ट असलेल्या शहर वाहतूक शाखेसह अनेक सदस्यांना याची अजून कल्पनाच नसून या समितीचे अस्तित्व केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

