आपलं पंढरपूर :- ‘मालक’ पुन्हा आमदार होणार या वार्तेने माने समर्थकांचा जल्लोष ! दिलीप माने विधानपरिषदेसाठी कॉगे्रसचे उमेदवार
माजी आमदार स्व.ब्रम्हदेव माने यांचे सुपूत्र माजी आमदार दिलीप माने यांना कॉग्रेसने विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली असून ही बातमी समजताच माने समर्थक कार्यकर्त्यांनी सोलापूरात अक्षरश: दिवाळी साजरी केली आहे.मालक पुन्हा आमदार होणार या बाबत हे कार्यकर्ते विजयाबद्दल आश्वस्त असून राष्ट्रवादी कॉग्रेसने पाठींबा दर्शविल्यामुळेच माने यांची उमेदवारी फिक्स झाल्याची चर्चा आहे. माने हे उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आपला संयुक्त उमेदवार उभे करणार आहेत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले होते की, राणेंनी निवडणूक लढवली किंवा नाही लढवली तरी आम्ही आमचा उमेदवार उभा करणार आहोत. येत्या 7 डिसेंबर रोजी या जागेसाठी निवडणुक होणार आहे. कॉंग्रेस सोडल्यामुळे राणेंना या जागेचा राजीनामा द्यावा लागला होता. या जागेसाठी 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. विधान परिषदेच्या या जागेवर विजय मिळविण्यासाठी 145 आमदारांच्या समर्थनाची गरज आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडे 81 आमदार आहेत.