आपलं पंढरपूर :- रुक्मिणी मातेचा महानैवेद्य वेळेवरच-मंदीर प्रशासनाचा दावा ! मात्र ते दोन वादग्रस्त कर्मचारी निलंबीत
24 नोव्हेंबर रोजी दोन कर्मचार्यांच्या वादात रुक्मिनी मातेच्या महानैवेद्यास विलंब झाल्याच्या बातम्या 25 नोव्हेंबरच्या वृत्तपत्रात झळकल्याने मंदीराची बदनामी झाली या दिवशीचे सिसीटिव्ही फुटेज तपासून पाहीले असता या दिवशी महानैवेद्य हा सकाळी 10 :48 ते 11:16 या नेहमीच्याच वेळत दाखविण्यात आला असल्याचे दिसून येत आहे.तसेच या बाबत रुक्मिणी गाभारा येथे कार्यरत असलेले कर्मचारी सुनिल गुरव व गणेश ताठे यांचे जबाबही घेण्यात आले आहेत.
मात्र 25 नोव्हेंबरच्या वृत्तपत्रातील बातम्यानुसार महानैवेद्यास विलंब झाला नसला तरी या दोन कर्मचार्यांना निलंबीत करण्याचे आदेश मंदीर समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी काढले आहेत.
मात्र 25 नोव्हेंबरच्या वृत्तपत्रातील बातम्यानुसार महानैवेद्यास विलंब झाला नसला तरी या दोन कर्मचार्यांना निलंबीत करण्याचे आदेश मंदीर समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी काढले आहेत.