आपलं पंढरपूर :- स्वाभिमानीची सोमवारी दिल्लीत धडक ! ‘स्वाभिमानी किसान एक्सप्रेस’ने हजारो कार्यकतें रवाना

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी दिल्लीत होणाऱ्या देशव्यापी आंदोलनासाठी शनिवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हजारो कार्यकर्ते कोल्हापुरातून रेल्वेने रवाना झाले. विविध जिल्ह्यातील   दोन हजारपेक्षा अधिक शेतकरी  या आंदोलनासाठी दिल्लीला  रवाना झाल्याचा अंदाज आहे.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने दिल्लीत सोमवारी देशव्यापी आंदोलन होणार असून दिल्लीला जाण्यासाठी  येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. या आंदोलनासाठी ‘स्वाभिमानी किसान एक्सप्रेस’ ही स्वतंत्र रेल्वे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने  बुक  करण्यात आली आहे.  सकाळी सव्वानऊ वाजता खासदार शेट्टी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व हिरवा झेंडा दाखवून स्वामिभानी किसान एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना झाली.
दरम्यान त्यापूर्वी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध आश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेवर आले; पण गेल्या तीन वर्षांत सरकारला  शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी शेट्टी म्हणाले, इतिहासात देशपातळीवर पहिल्यांदाच शेतकरी या आंदोलनानिमित्त एकत्र आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्चावर दीडपट हमीभावाचे आश्वासन दिले; पण त्यांनी ते पाळले नाही. संपूर्ण शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा व्हावा आणि उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव मिळाला, या मागणीसाठी शेतकरी एकत्र आला आहे.लोकवर्गणीतून अख्खी रेल्वे बुक केली आहे. हे इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शेतकरी महिलांही येणार असून, केंद्र सरकारने मागण्यांबाबत ठोस निर्णय घेतल्याशिवाय आता माघार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव