आपलं पंढरपूर :- कॉगे्रस(आय) ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी समिर कोळी यांची निवड
पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व मा.केंद्रीयमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक तसेच पंढरपूर कॉंग्रेस (आय) कमिटी मध्ये विविध पदावर काम करुन आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कोळी समाजाचे कॉंग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे समीरजी कोळी यांची सोलापूर जिल्हा कॉंग्रेस(आय) ओ.बी.सी.विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी मुंबई येथे ओ.बी.सी विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा. प्रमोदजी मोरे साहेब यांनी निवडीचे पत्र दिले. त्या वेळी मा. मोरे साहेब यांनी समीर कोळी यांच्या कार्याची ही पोच कॉंग्रेसने दिल्याचे म्हटले. यावेळी प्रा. अशोक डोळ, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य प्रा.मारुती भोसले, ज्येष्ठ नेते मामासाहेब ङ्गलटणकर, अमर सुर्यवंशी, सोमेश अभंगराव, शिवाजी धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
मा. समीर कोळी यांनी निवड झाल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री केंद्रीयमंत्री सुशिलकुमार शिंदे, आ.प्रणितीताई शिंदे, मा.आ.प्रकाशजी यलगुलवार, आ.भारत भालके, स.शि.सा.का.चे चेअरमन कल्याणराव काळे, सौ.सुनेत्राताई पवार, सौ.डॉ.साधनाताई उगले,प्रकाश पाटील यांच्या सहकार्यानेच माझी निवड झाल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मा.केंद्रीयमंत्री सुशिलकुमारजी शिंदे साहेब यांच्या आशिर्वादाची शाब्बासकी असून आ.प्रणितीताई शिंदे, आ.भारत भालके यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात ओ.बी.सी.विभागाचे पदाधिकारी निवड करुन नवसंजिवनी देण्याचे काम जोमाने चालू करणार असल्याचे समीर कोळी यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांचे अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चांगले संबंध असल्याने विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांनीही त्यांचे अभिनंदन केले.