आपलं पंढरपूर :- समाधान अवताडेंच्या ‘सायलेंट’मोर्चेबांधणीस पंढरपूरातील ‘नाराजांची’ साथ ?
पंढरपूर-मंगळवेढा विधानभा मतदार संघातून 2014 च्या निवडणूकीत तीसरा प्रबळ उमेदवार म्हणून निवडणूक लढवून आपल्या राजकीय वाटचालीत आणखी नव्या जोमाने वाटचाल करण्याचा विडा उचललेले दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व मंगळवेढयाच्या युवा पिढीमध्ये तसेच यंदा आपला आमदार हवा या भावननेने मतदान करणार्या मंगळवेढा तालुक्यातील मतदारांमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केलेले
समाधान अवताडे यांनी आपली राजकीय महत्वकांक्षा बाजूला ठेवली आहे की काय असा प्रश्न गेल्या काही महिन्यात पंढरीतील अनेक राजकीय जाणकारांना पडला होता.मात्र नुकत्याच झालेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात समाविष्ट असललेल्या 22 गावात ठिकठिकाणी झळकलेले त्यांना शुभेच्छा देणारे डिजीटल फलक व त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणारे व पंढरपूरातील पारपांरीक राजकीय विरोधक ठरलेल्या आ.भालके व परिचारक गटाचे नाराज कार्यकर्ते यांनी उघडपणाने घेतलेला सहभाग या मुळे समाधान अवताडे यांनी अतिशय शांतपणे आपली साखर पेरणी पंढरपूर शहर व तालुक्यात सुर ठेवल्याचेच निदर्शनास आले असून 2014 मध्ये पहील्यांदाच आमदारकीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरून समाधान अवतांडेंनी आपण सक्षमपणे आमदारकीची निवडणूक लढवू शकतो हे दाखवून दिले होते.त्यानंतर त्यांनी मंगळवेढा तालुक्यात राजकीय वर्चस्व प्राप्त करण्याकडे आपले लक्ष केंद्रीत केले होते.व दामाजी सहाकरी साखर कारखान्यावर सत्तांतर घडवून आणत तसेच मंगळवेढा नगर पालीकेत सत्तांतर करुन पालीकेवर अवताडे गटाचा झेंडा फडकावत आपली राजकीय वाटचाल दमादारपणे सुरु असल्याचे शाबीत केले होते.
मात्र याच दरम्यान त्यांनी पंढरपूर शहर व मतदार संघात समाविष्ट असलेल्या 22 गावांकडे दुर्लक्ष केले आहे अशीच चर्चा होउ लागली होती.पण त्यांनी दामाजी सहाकारी साखर कारखान्याची प्रगती आणि मंगळवेढा नगर पालीका व मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यामतून लोकाभिमूख सत्ता राबवून आपले राजकीय स्थान अधिक बळकट करण्याकडे लक्ष केंद्रीत केले होते.मात्र गेल्या काही महिन्यापासून त्यांनी पंढरपूर शहर व 22 गावात विशेष मोर्च बांधणी करण्यास सुरुवात केली असली तरी त्यांचे हे प्रयत्न अतिशय सावधपणे व प्रसिध्दीपासून दूर राहूनच सुरु असल्याचे दिसून आले आहे.पंढरपूर शहरात आपले राजकीय वजन बसविण्यासाठी अनेक संघटनांसह एका माजी नगसेवकासही त्यांनी हाताशी धरले असल्याची चर्चा असतान 22 गावातील परिचारक व आ.भालके यांच्यावर नाराज असलेल्या वजनदार कार्यकर्त्यांनाही आपलेसे करण्यासाठी त्यांनी दामाजीच्या कृपेने साखरपेरणी सुरु केली असल्याची चर्चा पंढरील राजकीय वर्तुळात आता हो़तना दिसून येत आहे.