आपलं पंढरपूर :- विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीने शहर बससेवा सुरु करावी ! भाविकांसह स्थानिक नागरिकांचीही होईल सोय
विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी काल झालेल्या समितीच्या बैठकीत शहरातील नागरिकांना व भाविकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी नियमात बदल करण्याचीही तयारी दर्शविली असून त्यामुळे मंदीर समितीच्या माध्यमातून शहराच्या विकासाबरोबरच सौदर्यीकरणाला व भाविकांसह स्थानिक नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.गेल्या काही वर्षात पंढरपूर शहराचा विस्तार मोठया प्रमाणात वाढला असून अनेक उपनगरासह कोर्टी,लक्ष्मी टाकळी,शेगाव दुमाला,भटुंबरे,वाखरी,कासेगाव हद्दीतही मोठया प्रमाणात स्थानिक नागरिकांच्या वसाहतीसह विविध मोठ मोठे मठ उभारण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.तर चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांच्या राहुटयांना हायकोर्टाने बंदी केल्यानंतर नदीच्या पैलतिरावरील 65 एकरातही मोठया प्रमाणात भाविकांचे वास्तव्य दिसून येते.
पुर्वी केवळ चार प्रमुख यात्रा व महिन्याच्या एकादशीला पंढरपूरात गर्दी करणारे भाविकभक्त आता वर्षभर मोठया संख्येने पंढरीत दर्शनाला येताना दिसून येतात.विशेषत: शनिवार व रविवारी भाविकांची वर्दळ मोठी असते.येथे आलेले भाविक विठ्ठल मंदीरासह गोपाळपूर,विष्णूपद,कैकाडी मठ अशा ठिकाणी भेटी देतात.त्याच बरोबर शहरातील व शहरालगतच्या आपल्या मठांमधून वास्तव्य करतात.
भाविक व शहरातील नागरिक यांना शहरार्तंगत व उपनगरातून तसेच लगतच्या फ्रिंजर एरियातून शहरात येण्या-जाण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीने शहर बस वाहतूक सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी अपेक्षा पंढरीतील नागरिकांकडून तसेच भाविकांकडून व्यक्त होत आहे.कालच्या बैठकीत मंदीर समितीने काही विधायकउपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.शेगाव येथे गजानन महाराज संस्थांकडून अशाच प्रकारची बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्याचे अनुकरण आपल्या मंदीर केल्यास स्थानिक नागरिकांची व भाविकांची मोठी सोय होणार आहे.