आपलं पंढरपूर :- मुद्रा योजनेतील कर्जासाठी बँकाचा ऐपतदारांनाच आग्रह ! सुशिक्षित बेरोजगारांना कोटा पुर्ण झाल्याचे उत्तर
छोट्या उद्योजकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पंतप्रधान मुद्रा योजनेअर्तंगत बँकाकडून कर्ज मिळावे यासाठी एकीकडे सुशिक्षित बेरोजगार युवक बँकाचे उंबरठे झिजवत असतानाच अनेक बँकांमध्ये या योजनेचे अर्जच उपलब्ध नाहीत तर काही बँका कागदपत्रांसाठी या बेरोजगार युवकांची अडवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे.अनेक बँकांनी टार्गेट पूर्ण करण्यासाठी जुन्याच ऐपतदार खातेदारांना एखादे कर्ज प्रकरण मुद्रा योजनेखाली उचला असा आग्रह करीत आपल्या बँकेचा कोटा पुर्ण करण्याचे टार्गेट पुर्ण करण्याचा फंडा अवलंबला असूनन त्या मुळे बेरोजगार युवक एखादा व्यवसाय करण्यासाठी या योजनेअर्तंगत कर्ज मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असेल तर त्याच्या वाटेला निराशाच येत असल्याचे दिसून येते.
मुद्र्ा योजनेचे कर्ज वितरण हे 50 हजार ते 10 लाख अशा तीन टप्प्यांत केले जाते. शिशू, मध्यम व मोठे असे वर्गीकरण या योजनेमध्ये करण्यात आले आहे; मात्र विशिष्ट बँकेत विशिष्ट परिसरातील व्यक्तींनाच कर्ज दिले जाईल, अशी अट असल्याने त्या बँकेच्या कार्यक्षेत्रातील बेरोजगारांना संबधीत बँकेत हेलपाटे मारण्याशिवाय पर्याय नसतो.काही बँकांच्या अधिकार्यांनी नवीन कर्ज प्रकरणे करून पुन्हा वसुलीचा डोक्याला ताप नको म्हणून त्यांच्याकडे असलेल्या व्यापारी खातेदारांना ङ्गोन करून त्यांचे अर्ज भरून घेतले व त्यांना आवश्यकता नसताना कर्ज वाटप केल्याची बाब उघड होत आहे. बँक अधिकार्यांच्या या धोरणामुळे शासनाच्या एका चांगल्या योजने पासून सामान्य नागरिक वंचित राहत आहेत.