आपलं पंढरपूर :- महावीर नगर मधील नव्या पाण्याच्या टाकीच्या डक्ट बेंडला क्रॅक व टाकीला गळती ! पालीकेचे महाराष्ट्र जिवन प्राधिरणास नगर कार्यवाहीसाठी वारंवार पत्र

महावीर नगर येथे महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या 10 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम अजुनही अपुर्ण अवस्थेत आहे.ही टाकी पुर्ण क्षमतेने सुरु झाल्यास महावीर नगर सह शहराच्या विविध भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत नागरिकांनी अनेक वेळा नगर पालीकेकडे तक्रार केली होती.मात्र सदर काम हे महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात असल्याने  नगर पालीका प्रशासनही संबधीत ठेकेदारावर थेट कारवाई शकत नव्हते.
   अनेक वर्षे रखडलेले हे काम कासवगतीने पुर्ण झाल्यानंतर आता पंढरपूर नगर पालीकेने या पाण्याच्या टाकीचे टेस्टींग नुकतेच केले असता या टाकीचे डक्ट बेंड क्रॅक असून त्याच बरोबर या टाकीस अनेक ठिकाणी गळती असल्याचे निदर्शनास आले आहे.या बाबत यापुर्वीच पंढरपूर नगर पालीकेने जिवन प्राधिकरणास पत्र दिले असून सदर टाकीची दोष दुरुस्ती त्वरीत करण्यात यावी अशी मागणी केली आहे.मात्र आज तागातय त्यावर कार्यवाही झाली नसून त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली ही टाकी महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे  निरुपयोगी अवस्थेत पडून असून नगर पालीका पाणी पुरवठा विभागाकडून वारंवार पत्रव्यवहार करुनही त्याची दखल महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे जबाबदार अधिकारी घेत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव