आपलं पंढरपूर :- विठ्ठल हॉस्पिटल स्व.कर्मवीर आण्णांच्या स्वप्नांची परिपूर्ती
पंढरपूर तालुक्यातील कष्टकरी शेतकर्यांच्या वैभवाचे अग्रदूत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आणि सर्वसामान्य शेतकर्यांच्या हितासाठी आपली संपूर्ण हयात व्यतीत केलेले स्व.कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील म्हणजे पंढरपूर तालुक्यातील बळीराजाच्या दृष्टीने देवदूतच होते. आजही स्व.कर्मवीर आण्णांच्या आठवणी अतिशय विनम्रपणे काढल्या जात असल्याचे चित्र पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर दिसून येते.
माझ्या तालुक्यातील शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, त्याच्या कष्टाचे चिज झाले पाहिजे आणि त्याच्या जीवनात वैभवाचे दिवस आले पाहिजेत हेच स्वप्न जोपासत स्वर्गीय औदुंबर आण्णांनी आपली राजकीय वाटचाल केली. यातूनच साकारले गेले श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानारूपी मंदिर. कर्मवीर औदुंबरआण्णांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची उभारणी करताना माझ्या तालुक्यातील शेतकर्यास सोन्याचे दिवस पहावयास मिळाले पाहिजेत. हे स्वप्न बाळगून त्या स्वप्नाची पूर्तता केली. त्याचप्रमाणे माझ्या तालुक्यातील शेतकरी हा कुठल्याही आजारपणामुळे अथवा दुर्घटनेमुळे उपचारापासून वंचित राहिला नाही पाहिजे ही मनिषाही त्यांनी मनी बाळगली. यातूनच त्यांनी विठ्ठल हॉस्पिटलचे स्वप्न पाहिले. त्यांच्या या स्वप्नाची पूर्तता होण्यास अनेक कायदेशीर अडथळे आले. मात्र त्याची पर्वा न करता स्वर्गीय औदुंबरआण्णांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांना आत्मविश्वास होता की, आपला हेतू चांगला असेल तर आपला शेतकरी सभासद सदैव आपल्या पाठिशी राहिल. वाट्टेल ते सहकार्य करेल आणि वेळप्रसंगी वाट्टेल तो त्यागही करील. याच आत्मविश्वासातूनच स्वर्गीय औदुंबरआण्णांनी श्री विठ्ठल हॉस्पिटलची भव्य इमारत उभारली. पंढरपूर सातारा रोडवरील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयासमोरील जवळपास 25 एकराच्या विस्तीर्ण जागेत या हॉस्पिटलची सर्व सोयींनी सुसज्ज असलेल्या इमारतींचा समूह उभा असलेला आपणाला दिसतो.
स्वर्गीय औदुंबरआण्णा पाटील हे दृष्टे नेते होते. भविष्याचा वेध घेणारे नेतृत्व होते. त्यामुळे त्यांनी श्री विठ्ठल हॉस्पिटलचे स्वप्न पाहिले होते. 25 वर्षापूर्वी आणि आजही पंढरपूर शहरात पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सुविधा, अत्याधुनिक उपचार प्रणाली उपलब्ध नसलेल्याचेच दिसून येते. त्यावेळी आकस्मातरित्या उद्भवलेल्या कुठल्याही गंभीर आजारावर उपचारासाठी, अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथे नेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळेच अल्पदरात व अत्याधुनिक उपचार पंढरीत झाले पाहिजेत, आपला कष्टकरी शेतकरी बांधव गरीब आहे, त्यांना उपचाराचा प्रचंड खर्च परवडणारा नाही हे लक्षात घेवून स्वर्गीय औदुंबरआण्णा पाटील यांनी श्री विठ्ठल हॉस्पिटलचे स्वप्न पाहिले होते.
आज श्री विठ्ठल हॉस्पिटलची वाटचाल स्वर्गीय औदुंबरआण्णांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने चालू असून कर्मवीर औदुंबररावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व पंढरपूर तालुक्याचे युवा नेते मा.युवराजदादा पाटील हे स्वर्गीय आण्णांच्या स्वप्नपूर्तीसाठी परिश्रम घेत आहेत. तर या ट्रस्टचे सर्व विश्वस्त मंडळ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून विठ्ठल हॉस्पिटलच्या माध्यमातून शहर व तालुक्यातील कष्टकरी जनतेस अतिशय अल्पदरात व अत्याधुनिक पद्धतीने उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिश्रम घेत आहेत. गेल्या काही वर्षात श्री विठ्ठल हॉस्पिटलच्या माध्यमातून तसेच कर्मवीर क्रिटीकेअर सेंटरच्या माध्यमातून या हॉस्पिटलमध्ये अनेक उपक्रम, आरोग्य तपासणी शिबीर आदींचे आयोजन करण्यात आले असून त्यामुळे विठ्ठल हॉस्पिटल हे पंढरीतील वैद्यकीय क्षेत्रात सर्वसामान्य जनतेचे सर्वात प्रभावशाली केंद्र म्हणून उदयास आले आहे.आज स्व.औदुंबर आण्णांच्या 94 व्या जयंतीचे औचित्य साधून विठ्ठल हॉस्पिटल मध्ये टू-डि.इको सेवेचा शुभारंभ होत आहे.त्यामुळे रुग्णांच्या विविध आजाराचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निदान होणार आहे व तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.त्यामुळे गोरगरीबांसाठी तसेच शेतकरी वर्गासाठी स्वस्त आणि खात्रीचे उपचार उफलब्ध होणार आहेत. भविष्यात विठ्ठल हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक उपचार सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपचार प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार असून त्यासाठी या ट्रस्टचे अध्यक्ष युवराजदादा पाटील, उपाध्यक्ष व मा.जेष्ठ नगरसेवक विलासराव साळुंखे तसेच ट्रस्टचे सर्व विश्वस्त प्रयत्नशील आहेत. म्हणूनच भविष्यात विठ्ठल हॉस्पिटल हे सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलशी स्पर्धा करू लागेल असा आत्मविश्वास आम्हास वाटतो.
*************