आपलं पंढरपूर :-खा.राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा रविकांत तुपकर यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती

पंढरपूर तालुक्यातील उंबरे येथे मंगळवार दिनांक 28 रोजी सायंकाळी ठिक 7 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास खा.राजू शेट्टी व वस्त्रोध्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून या प्रसंगी ऊसदरासाठी प्राण पणास लावून 12 दिवस आमरण उपोषण केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
            या शेतकरी मेळाव्यात शेतकर्‍यांच्या महत्वपुर्ण मागण्यांबाबत चर्चा होणार असून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.यामध्ये शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहीजे,साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन झाले पाहीजेत,विज वितरण कंपनी शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट करीत आहेत हा अन्याय त्वरीत थांबवला पाहीजे,अनेक कारखान्यांकडून ऊस गाळपावेळी रिकव्हरी मध्ये मोठा घोळ केला जातो.साखर कारखान्यांची रिकव्हरी चेक करण्यासाठी शासकिय अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी असलेली कमिटी स्थापन करावी.स्वाभिमानथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात आदी शेतकर्‍यांच्या महत्वपुर्ण मागण्याबाबत चर्चा होणार असून शेतकर्‍यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ माने यांनी केले आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव