आपलं पंढरपूर :- कोपर्डी खटला : तिनही नराधमांना फाशी

राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खून खटल्यातील तिन्‍ही दोषींना अहमदनगर जिल्‍हा सत्र न्‍यायालयाने मृत्‍यूदंडाची म्‍हणजे फाशींची शिक्षा सुनावली आहे. आज सकाळी 11 वाजता मुख्‍य आरोपी जितेंद्र शिंदे, दुसरा आरोपी संतोष भवाळ, तिसरा आरोपी नितीन भैलुमे यांना ही शिक्षा सुनावण्‍यात आली.
गेल्या आठवड्यात जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी शिक्षा सुनावलेल्या लोणी मावळा (ता. पारनेर) कोपर्डी खटल्यात साधर्म्य आहे. दोन्ही घटना अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खून केल्याच्या आहेत. दोन्ही खटल्यांमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. परिस्थितीजन्य पुराव्यांवर युक्तिवादावर दोन्ही खटले आधारित होते. दोन्ही खटल्यांत विशेष सरकारी वकील निकम यांनीच काम पाहिले.
मुख्य आरोपीच्या वतीने वकीलपत्र घेण्याचा ठराव नगरच्या वकील संघटनेने केला होता. त्यामुळे त्याची बाजू मांडण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. योहान मकासरे यांची नियुक्ती करण्यात आली. दुसरा आरोपी संतोष भवाळ याच्या वतीने अॅड. बाळासाहेब खोपडे, त्यांची कन्या अॅड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी काम पाहिले. तिसरा आरोपी नितीन भैलुमे याच्या वतीने अॅड. प्रकार आहेर यांनी काम पाहिले. एक वर्ष एक महिन्यानंतर आता खटल्याच्या निकालाचा दिवस उजाडला आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव