आपलं पंढरपूर :-चार बालकांच्या कुटुंबास शासनाकडून अर्थिक मदत ! बबलू बोराळकर यांचे उपोषण तर आ.भारत भालके आणि मंदीर समिती सदस्य सचिन अधटराव यांचा पाठपुराव्यास यश
चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्डयात बूडून मृत्यूमुखी पडलेल्या चार बालकांच्या कटुुंबास मुख्यमंत्र्याकडून अर्थिक मदत जाहीर करूनही पंढरपूर तहसिल कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या चुकीच्या अहवालामुळे सदर मदत मिळण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता.हा अहवाल दुुुरस्त करुन वास्तव अहवाल पाठवावा यासाठी युवा कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बबलू बोराळकर यांनी तहसिलदार पंढरपूर यांच्याकडून यापुर्वी पाठविलेला अहवाल दुुरुस्त करुन वास्तव अहवाल पाठवावा या मागणीसाठी येथील तहसिल कार्यालयाच्या दारात ऐन दिवाळीत आमरण उपोषण केले होते.या उपोषणास पंढरपूरातील विविध पक्ष संघटना आणि व्यक्तींनी आपला पाठींबा व्यक्त केला होता.
यावेळी आ.भारत भालके यांनी थेट जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधून तात्काळ मदत देण्याच्या सुचना केल्या होत्या तर मंदीर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांनी या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागणीचा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याच्या माध्यामातूून पाठपुरावा केला होता.कोळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील यांनीही या उपोषणाची माहीती घेवून या बाबत शासनस्तरावर थेट संपर्क करुन चार बालकांच्या कुटुंबास तात्काळ मदत देण्याच्या सुचना केल्या होत्या.याचा एकत्रीत परिणाम म्हणून दुर्घटनाग्रस्त शहापूरकर व जुमाळे कुटुंबास शासनाने प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत केली आहे.