आपलं पंढरपूर :- विधानसभा आणि लोकसभा निवडणूका एकाच वेळी ? मोदींनी मन की बात मधून दिले संकेत

विधानसभा आणि लोकसभा निवडणूका वेगवेगळ्या घेतल्या की हजारो कोटी रुपये विनाकारण खर्च होतात ज्या राज्याच्या विधासभेची मुदत ही लोकसभा निवडणुकीच्या नंतर सहा महिन्यांच्या आत संपत आहे अशा राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूका लोकसभा निवडणूकीबरोबरच घेतल्या जाव्यात अशी मागणी विविध सामाजिक संघटना व संस्थांद्वारे करण्यात येत होती.तर अनेक विचारवंतानी व अर्थतज्ञानी याचे समर्थनही केले होते.याच महत्वपुर्ण विषयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात च्या मांध्यमातून व संविधान दिनाचे औचीत्य साधून वाचा फोडली असून अशाप्रकारे या दोन्ही निवडणूका एकत्र घेण्याचे समर्थन करुन त्यांनी याच्या अंमलबजावणीचे संकेत दिले आहेत.
              लोकसभेच्या निवडणूका यापुर्वी फेब्रुवारी व मार्च 2014 मध्ये झाल्या होत्या तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूका ऑक्टोंबर 2014 मध्ये पार पडल्या होत्या.या अनुषंगाने पंतप्रधान मोदींनी मन की बात च्या माध्यमातून प्रकट केलेल्या आपल्या विचारांनी महाराष्ट्रात मुदतपुर्व निवडणूकीच्या चर्चेस एकप्रकारे बळच दिले असून लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या निवडणूका घेवून मोदी यांच्या राष्ट्रिय धोरणाबद्दल असलेल्या लोकप्रियतेचा फायदा राज्यात प्रचंड नाराजी आणि अप्रियता याचे शिकार बनलेल्या भाजपास होऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीवेळीच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांना करुन लोसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणूकीस सामोरे जातील अशी शक्यता राजकीय वर्तुळात होताना दिसून येत आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव