आपलं पंढरपूर :- तुळशी वनाचे काम रद्द करा ! विविध सामाजिक संघटांचे वनविभागास आको्रश पत्र

शहरातील यमाई तलाव परिसरात यमाई तलाव सरोवर सवर्धन विकास आराखडयाच्या मुळ प्रस्तावात जिथे छोटया स्वरुपातील आकर्षक बागेचा प्रस्ताव होता त्याच ठिकाणी नमामि चंद्रभागा अभियानाची घोषणा झाल्यानंतर वनविभागाच्या वतीने तुळशीवन तयार करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.सद्या वन विभागाच्या वतीने या ठिकाणच्या 1 एकर जागेसाठी कंपाऊड वॉल व रिटेनिंग वॉल साठी एकुण 92 लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आले  असून हे काम अनावश्यक व गैरवाजवी आहे.
                 यमाई तलावाचा मुळ विकास आराखडाच राबविण्यात यावा व शहरातील नागरिकांच्या मुलभूत समस्या आधी सोडवाव्यात मगच अशा प्रकारे तुुळशीवनासारख्या बोगस कामांवर पैसा खर्च करावा अशी मागणी शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येवून आको्रशच्या स्वरुपात वनविभागाकडे केली आहे.हे आक्रोशपत्र देताना सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघमारे,शिवबुध्द प्रतिष्ठाणचे संदीप मुटकुळे,धनगर समाजउन्नती मंडळाचे संतोष बंडगर,वैभव आलदार,भालचंद्र थोरात,महेश शिंदे आदी उपस्थित होते.  

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव