आपलं पंढरपूर :- गुंड, गुन्हेगारांचे डिजीटल फलक लावून उदात्तीकरण करणे थांबले पाहीजे ! उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पिंगळे यांनी व्यक्त केली नाराजी

शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या बलीदानाने पंढरपूर शहरातील प्रत्येकांचे उर अभिमाने भरून आलेले आहे.तर आजही शहीद कुणालची आठवण आली की मान गर्वाने उंचावते. जन्म ते शेवटी स्मशानात राख होणे हा प्रवास आपण प्रत्येकजणच करीत असतो.मात्र फार थोडे असतात ज्यांच्या स्मृती चिरंतर आणि अजरामर राहतात.शहीद कुणाल हे देशाविरोधातील शत्रुंशी सिमेवर लढले आपणास आपल्यातच वावरणार्‍या सामान्य लोकांच्या शत्रूशीही लढा द्यायचा आहे.चांगल्या गोष्टींचे,व्यक्तींचे उदात्तीकरण करा,गुंड,गुन्हेगारांच डिजीटल फलक लावून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न करू नका उलट अशा प्रवृत्तींविरोधात लढा उभारण्यासाठी सज्ज व्हा.अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकाविरोधात तक्रारी करण्यासाठी पुढे या असा संदेश आज शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या स्मृतीदिनानिमित्त शहर भाजपाच्या वतीने आयोजीत रॅलीच्या समारोप प्रसंगी येथील चौफाळा येथे आयोजीत कार्यक्रमात बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पिंगळे यांनी व्यक्त केले.
             यावेळी शहीदपत्नी उमादेवी कुणाल गोसावी,नगराध्यक्षा साधना भोसले,भाजपाचे शहर चिटणंीस संजय वाईकर,गौरी अंमळनेरकर यांच्यासह शहर भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व विविध प्रशालांचे विद्यार्थी,विद्यार्थीनी व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव