आपलं पंढरपूर :- मोबाईल बंद अन् अधिकारी सायलेंट ! फीरतीच्या नावाखाली शास्त्री भेटेणात अन् मिटींगच्या नावाकाली सीओ भेटेणात
नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत 25 मिनिटात 72 विषयांना मंजूरी देण्याचे दिव्य पार पाडल्यानंतर पंढरपूर नगर पालीकेतील अनेक अधिकारी व कर्मचार्यांनी सुटकेचा श्वास सोडला असल्याचे दिसून येत असून या सर्वसाधारण सभेनंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना नगराध्यक्षा साधानाताई भोसले यांनी आपण व्यक्तीश: आठवडयातून तीन दिवस नगर पालीकेत उपस्थित राहून येथील प्रशासनावर वचक निर्माण करू व नागरिकांच्या समस्या व तक्रारी याचे परिमार्जन करू अशी करू अशी ग्वाही दिली होती.मात्र या आश्वासनास आठ दिवसाचा कालावधी लोटला नाही तो पर्यंतच पंढरपूर नगर पालीकेत पहीले पाढे पंचावन्न अशीच अवस्था दिसून येत असून बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी शास्त्री हे एकतर फीरतीवर असतात किवा मिटींगच्या नावाखाली कार्यालयात अनुपस्थीत असतात किवा ते कुठे गेले आाहेत याचे गुपीत कुणालाचा माहीत नसते.ना फीरती रजिष्टरला नोंद ना मोबाईल सुरु अन् सुरु असलाच तर फोन उचल्याची तसदी घेण्यास ना त्यांना सवड असाच अनुभव अनेक नागरिकांना वारंवार येत आहे.
महसुल प्रशासनाने तलाठी,मंडळ अधिकारी यांना तर जिल्हा परिषदेने ग्रामसेवक,जेई,विस्तार अधिकारी,रेखांकक यांना फीरती मांडल्याशिवाय कर्तव्याचे ठिकाण सोडू नये असे आदेश दिले आहेत.अन् जर यांनी फीरती मांडून कार्यालय सोडलेच तर ते कुठे गेले आहेत,केव्हा येणार आहेत याची माहीती नोटीस बोर्डवर लावणे अनेक ठिकाणी वंधनकारक केले आहे.हा नियम पंढरपूच्या कर्तव्यदक्ष व वेगळे काहीतरी करुन दाखविण्याची द्रष्टी असलेल्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी नगर पालीकेतील अधिकारी व कर्मचार्यांना लागू करावा अशीच अपेक्षा शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.नगर पालीकेतील कर्मचार्यांना नगर पालीकेने सिरीयल मोबाईल नंबर दिले आहेत.मात्र अनेक अधिकारी हा नंबर बंद ठेवत असून या बाबत विचारणा केली असता मिटीग अथवा फिरतीचे कारण पुढे करीत आहेत.कुठल्याही परिस्थीतीत संपर्कासाठी दिलेला नंबर बंद ठेवू नये व जर मिटीग असेल तर हा नंबर सायलेंट ठेवावा वर आलेल्या प्रत्येक मिसकॉलला परत फोन करुन समस्या जाणून घ्यावी एवढी जबाबदारीही या शहरातील करदात्या नागरिकांसाठी जर हे अधिकारी व कर्मचारी पार पाडण्यास तयार नसतील तर त्यांच्यावर कारवाई केॅली जावी अशीच अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.