आपलं पंढरपूर :- आ.भालकेंनी ‘स्विकृत’ करावे यासाठी अनेकजण इच्छुक ! परिचारक गटात मात्र शांतता !

पंढरपूर नगर पालीकेच्या स्विकृत नगरसेवकांची खांदेपालट होणार असून 25 डिसेंबरच्या आसपास नव्या स्विकृत नगरसेवकांची निवड केली जणार असल्याची चर्चा सद्या पंढरीच्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली असून आ.भारत भालके नव्याने कोणाला स्विकृत नगरसेवक पदाची संधी देणार याकडे आ.भालके समर्थकांचे लक्ष लागले आहे.स्विकृत नगसेवक पदासाठी आपण कसे योग्य उमेदवार आहोत व आपणास आतापर्यंत कशी संधी नागारण्यात आली,गत नगर पालीका निवडणूकीवेळी आपणास योग्य असूनही उमेदवारी कशी नाकारण्यात आली आणि त्यामुळेच आपल्या प्रभागात कसा फटका बसला याची सुरस कथा स्विकृत नगरसेवकपदसाठी इच्छुक असलेले अनेक सामाजिक व राजकिय कार्यकर्ते विस्तृतपणे मांडताना दिसून येत आहेत.
       स्विकृत नगरसेवकपदाबाबात शासनाने अनेक नविन नियम व अटी लागू केल्या आहेत.शासनाने नव्या आदेशानुसार नामनिर्देशित सदस्य निवडताना नगरपालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान असलेल्या व्यक्तीला प्राधान्य देण्याचे सुचित केले आहे. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी, व्यावसायिक म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव तसेच शिक्षण क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव असलेला, सनदी, लेखापाल, अभियांत्रिकी पदवीधर, विधी क्षेत्रातील अनुभवी, सेवानिवृत्त मुख्याधिकारी याचबरोबर सार्वजनिक विश्वस्त संस्थेअंतर्गत समाजाधिष्ठित संस्थेचा अशासकीय संघटनेचा कामाचा पाच वर्ष अनुभव असलेल्या जाणकार व्यक्तीला या नामनिर्देशित सदस्यत्वासाठी निवडावे असे बजावले आहे.
            2016 मध्ये झालेल्या पंढरपुर नगर पालीकेच्या निवडणूकीत नगर पालीकेवर परिचारक गटाची एकहाती सत्ता आली होती. तर आ.भालके गटास केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले होते.2004 मधील विधानसभा निवडणूकीवेळी माजी नगरसेवक अशोक डोंबे यांनी केलेले सहकार्य आठवणीत ठेवून आमदार भारत भालकेंनी अशिष डोंबे यांना स्विकृत नगरसेवकपदाची संधी दिली होती.यामुळे आ.भारत भालके यांच्यासाठी 2014 च्या निवडणुकीत जिवाचे रान केलेले अनेक प्रमुख कार्यकर्ते खुपच नाराज झाले होते.काही जणांनी तर आपण यापुढे आ.भालकेंच्या ऑफीसची पायरी चढणार नाही अशी भिष्मप्रतिज्ञाही केली होती.मात्र ही प्रतिज्ञा पुढे पेल्यातील वादळ असल्याचेच दिसून आले होते.आता पुन्हा एकदा स्विकृत नगरसेवक पदाची चर्चा रंगात आली असून स्विकृत नगरसेवक पदाबाबत परिचारक गटात शांतता असली तरी आ.भालके गटातील अनेक कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.व आपणास आता तरी न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करीत आहेत.आ.भालके या बाबत काय निर्णय घेतात याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.मात्र मतदारांनी 2014 च्या निवडणूकीत मोठया मताधिक्क्याने पराभूत केलेलेही काहीजण या पदासाठी आपणच कसे योग्य आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत असले तरी ज्यांनी यापुर्वी नगरसेवकपद भुषविले आहे व 2014 च्या निवडणूकीत जनतेने ज्यांना नाकारले आहे अशांना संधी देवू नये अशी प्रतिक्रिया काही जाणकार व्यक्त करीत आहेत.    

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव