आपलं पंढरपूर :-शहर महावितरणच्या आनगोंदी काराभारा विरोधात सोमवारी धरणे आंदोलन !

पंढरपूर शहर महावितरणच्या वतीने शहरातील वीज ग्राहकांवर मोठा अन्याय होत असून कर्मचारी वीज रिडींग वेळेवर नेत नाहीत तर अनेक वेळा चुकीचे रिडींग दाखवीले जाते.तसेच सरासरी विज वापरापेक्षा अनेक ग्राहांना अचानक पणे जास्तीचे बील येथे.मुळात हे बील हातात पडण्यासच दहा तारीक उजाडते आणि बील भरण्याची मुदत वीस तारखेच्या आसपास असते.एखाद्या ग्राहकाने वाढीव बीलाबाबत तक्रार केल्यास त्याची दखलच घेण्यास टाळाटाळ केली जाते.तो पर्यंत पुन्हा पुढील महीन्याचे बील दिले जाते व थकबाकीमुळे अनेकांचे कनेक्शन कट केले जाते.शहर महावितरणच्या या अनागोंदी कारभाराविरोधात शिवबुध्द युवा प्रतिष्ठाणच्या वतीने सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर ग्राहकांसमवेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा प्रतिष्ठाणच्या वतीने आज निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
             या बाबत तक्रार करण्यासाठी संबधीत टेबलवरील कर्मचारीच जागेवर उपस्थित नसतात.तर महावितरणचे शहर अतिरिक्त कार्यकारी अभियंता कार्यालयात वारंवार गैरहजर असतात.यामुळे सामान्य वीज ग्राहकांवर मोठा अन्याय होत असून कुठलीही नोटीस न देता थेट विज कनेक्शन कट करण्यात येत असल्याचेही दिसून येते.महावितरणच्या या मनमानी काराभारामुळे लोकभावना संतप्त आहेत.महावितरणचे अतिकार्यकारी अभियंता श्री उत्पात हे आपल्या कार्यालयात वारंवार अनुपस्थित असतात.त्यामुळे त्यांच्यावर योग्य  ती कारवाई करावी अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Popular posts from this blog

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव