आपलं पंढरपूर:- या रस्त्यांचे यापुर्वी केव्हा कॉक्रीटीकरण केले होते याचा खुलासा न.पा.प्रशासन करेल काय ? पंढरपूर शहरातील विविध प्रभागात रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या निविदा निघाल्या !

पंढरपूर नगर पालीकेच्या वतीने पंढरपूर शहरातील अनेक महत्वपुर्ण रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणाच्या निविदा पंढरपूर नगर पालीकेने आमंत्रीत केल्या आहेत.यातून शहरातील काही प्रभागात रस्ते कॉंक्रिटीकरण  करण्यात येणार आहे.जवळपास 90 लाख रुपये खर्चाच्या या निविदा नगर पालीकेने आमत्रीत केल्या असून या निविदांमध्ये विविध रस्त्यांचे वर्णन देवून या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी निविदा आमंत्रीतीत करण्यात आल्या आहेत.यापुर्वी या रस्त्यांचे केव्हा कॉक्रिटीकरण केले होते याचाही खुलासा नगर पालीका प्रशासनाने करावा अशी रास्त अपेक्षा या प्रभागातील नागरिकांमधून व्यक्त होताना दिसून येत आहे.
    याच बरोबर पंढरपूर नगर पालीकेने 21 नोव्हेंबर रोजी आमंत्रीत केलेल्या निविदेनुसार 2 कोटी 80 लाख रुपये अपेक्षीत खर्च करुन पंढरपूर शहरातील विविध रस्ते तयार करण्यासाठी निविदा आमंत्रीती केल्या आहेत.मात्र या इतक्या मोठया खर्चाच्या निविदेमध्ये कुठल्या रस्त्याचे काम करण्यात येणार आहेत या बाबत कामाचे वर्णन नसल्याने या ई टेंडर प्रक्रियेबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.एकीकडे नगर पालीका प्रशासन रस्त्याचा दहा-वीस लाखांच्या कामाचे टेंडर काढताना कुठल्या रस्त्याचे काम आहे याचे वर्णन प्रसिध्द करते मात्र त्याच वेळी 2 कोटी 80 लाख रुपये खर्च अपेक्षीत असलेल्या कामांची माहीती निदान  निविदा प्रक्रियेच्या माद्यमातून तरी सार्वजनिक करावी अशी रास्त अपेक्षा पंढरपूरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव