आपलं पंढरपूर:- तिर्थक्षेत्र पंढरीत दारुबंदीचे पुढे काय झाले ? खासदार अमर साबळे यांच्या पाठपुराव्यास अपयश

गुजरातच्या धर्तीवर आणि चंद्रपूर जिल्हयाचा आदर्श डोळयांसमोर ठेवून राज्यातील देहू-आळंदी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्र परिसरात पूर्णपणे दारूबंदी करावी, अशी मागणी भाजपचे खासदार अमर साबळे यांनी जुन 2016 मध्ये पंढरीत आल्यानंतर केली होती. या मागणीसाठी प्रमुख वारकर्‍यांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांना भेटणार असल्याचे त्यावेळी खा.साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.त्यांच्या या घोषणेस जवळपास दिड वर्षाचा कालावधी लोटला असूण अजूनही याबाबत कुठलाच पाठपुरावा खा.साबळे हे करीत नसल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे आता वारकरी संघटनांनीच एकत्र येवून या वैकुंठ नगरीत संपुर्ण दारुबंदीसाठी खा.साबळे यांना सोबत घेवून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणे गरजचे झाले आहे.
खा.साबळे यांनी पंढरीत घेतलेल्या पत्रकारा परिषदेपुर्वी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालखी सोहळयाच्या नियोजनासाठी पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांनी आयोजीत केलेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता.देहू-आळंदी आणि पंढरपूर ही तीर्थक्षेत्रे आहेत. लाखोंच्या संख्येने वारकरी या ठिकाणी येत असतात. त्यामुळे पावित्र्य राखण्यासाठी या परिसरात दारूविक्री होता कामा नये, गुजरातमध्ये दारूबंदी आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे दारूबंदी आहे. तर मग या तीन ठिकाणी दारूबंदी का होऊ शकत नाही, असा मुद्दा साबळे यांनी उपस्थित केला होता.एकीकडे भुवैकुंठ म्हणून पंढरपूरच्या विकासासाठी राज्य शासन अब्जावधी रुपये उपलब्ध करीत असताना येथे आध्यात्मिक व सांस्कृतीक विकासासाठीची नैतिक जबाबदारीही प्रशासनाची आहे हे लक्षात घेवून या शहरात पुर्णत: दारुबंदीसाठी नव्या जोमाने प्रयत्न करणे गरजचे झाले आहे.आणि यासाठी खासदार अमर साबळे हे पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करतील अशी अपेक्षा सजग नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
यापुर्वी वीस वर्षापुर्वी विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष व फडकरी संघटनेचे अध्यक्ष वै.विवेकानंद वासकर महाराज यांनीही याच मागणीसाठी मोठे आंदोलन केले होते.त्यावेळी सत्तेत असलेल्या युती शासनाने या मागणीस पध्दतशीरपणे बगल दिली होती.पुढे पंढरीत दारु-आीण मास विक्रीस परवानगी देवु नये यासाठी ह.भ.प.बंडात्यात्या कराडकर यांनीही शासनास निवेदने दिली होती.आता खा.अमर साबळे यांनी या विषयास पुन्हा वाचा फोडली होती.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव