आपलं पंढरपूर :-संकेत आटकळे खून प्रकरण : तत्कालीन पो. नि. दिलीप जाधवसह चार कर्मचाऱ्यावर कारवाई तपास व्यवस्थित न करीत आरोपींना सहकार्य केल्याचा ठपका !

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांच्यासह चार कर्मचाºयांवर राज्याचे पोलीस महासंचालक विभागाने कारवाई करीत वेतनवाढ रोखली आहे. सन २०१३ साली झालेल्या शेगाव दुमाला (ता. पंढरपूर) येथील पाच वर्षीय संकेत आटकळे खून प्रकरणाचा तपास व्यवस्थित न करता आरोपींना सहकार्य केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली. चक्क राज्याच्या पोलीस महासंचालक विभागाकडून कारवाई झाल्यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 
सन २०१३ साली पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथील पाच वर्षीय संकेत आटकळे या बालकाचे अपहरण करून खून करण्यात आला होता. त्यावेळी हे प्रकरण राज्यभर गाजले होते. मात्र तालुका पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली नव्हती. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील व कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक चव्हाण यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातल्यानंतर एक महिन्यांनी आरोपींना अटक करण्यात आली. मात्र या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित न करता आर्थिक हितसंबंध जोपासत आरोपींना सहकार्य केल्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेतली होती. तब्बल चार वर्षे याबाबत सुनावण्या होऊन पोलीस प्रशासनाने चौकशी करीत यामध्ये दोषी आढळल्याने पो. नि. दिलीप जाधव, तत्कालीन सपोनि राजेंद्र मस्के, पोहेकॉ. वाघमोडे, मोमिन, माने यांच्यावर वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे.
या प्रकरणाचा तपास व्यवस्थित न केल्यामुळे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी तालुका पोलिसांचा कसुरी अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांकडे पाठविला होता. यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाने करमाळ्याचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पाटील यांनी प्राथमिक चौकशी केली होती. या चौकशीत पो. नि. दिलीप जाधवसह चार कर्मचारी दोषी आढळल्याने राज्याचे अप्पर पोलीस महासंचालकांच्या आदेशाने या कर्मचाºयांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. ही विभागीय चौकशी तत्कालीन होम डीवायएसपी दिलीप चौगुले यांनी करून जानेवारी महिन्यामध्ये या कर्मचाºयांचा अहवाल पोलीस महासंचालक कार्यालयास सादर केला होता. यावर पोलीस महासंचालक विभागाने नुकतीच कारवाई केली आहे. तत्कालीन पो. नि. दिलीप जाधव, तत्कालीन सपोनि राजेंद्र मस्के, पोहेकॉ. मोमीन, माने, सेवानिवृत्त उपनिरीक्षक वाघमोडे यांची वेतनवाढ रोखली आहे. 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव