आपलं पंढरपूर:- पोलीस पाटील पदाच्या मुलाखती की ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया ? गर्दीतील गावपुढारी उमेदवारांमुळे संभ्रम !

पंढरपूर तालुक्यातील पोलीस पाटील पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेनंतर भरतीप्रकियेतील अंतीम टप्प्यात आज मुलाखतीसाठी येथील प्रांत कार्यालयात मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.या पदासाठी अर्ज केलेल्यांमध्ये सुशिक्षीत बेरोजगार युवकांबरोबरच अनेेक राजकीय पक्ष,संघटनांचे पदाधिकारी,माजी ग्रामपंचायत सदस्य तर गावच्या राजकारणात हीरहिरीने पुढे असणारे अनेकजण दिसून येत होते.आज या मुलाखत प्रक्रियेसाठी उपस्थित गर्दी पाहून प्रांत कार्यालयात आलेले  राजकीय कार्यकर्ते,आजी माजी पदाधिकारी पाहून ग्रामपंचायतीच्या निवडणूका तर लागल्या नाहीत ना असाच प्रश्‍न पडला असल्याचे दिसून आले.
     गावगाडयात पोलीस पाटील हे पद महत्वाचे असून या पदासाठी नियुक्त पोलीस पाटलास शासनाकडून मानधन मिळणार आहे.तर पोलीस पाटील म्हणून गावात सन्मानही मिळणार आहे.एका दगडात दोन्ही निशाणे साधण्यासाठी आज अनेकजण आपल्या अंगावरील पांढरे कपडे उतरवून साध्या वेशात मुलाखतीसाठी तिष्ठत थांबलेले दिसून आले.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव