आपलं पंढरपूर :- पंढरीत शहीद टिपू सुलतान जयंती विधायक उपक्रमाने साजरी

शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्या वतीने अनावश्यक खर्चास बगल देत पंढरपूर शहरातील लहान मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करुन शहीद टिपू सुलतान यांची जयंती विधायक उपक्रमाने साजरी करण्यात आली.येथील बोहरी हॉस्पिटल मध्ये आयोजीत या तपासणी शिबीरात अनेक बालकांची संपुर्ण शारीरीक तपासणी करुन मार्गदर्शन करण्यात आले.प्रारंभी विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष डि.राज सर्वगोड यांच्या हस्ते टिपू सुलतान यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
       या उपक्रमासाठी पंढरीतील प्रतिथयश डॉ.अरिफ बोहरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदम बागवान,शहराध्यक्ष जमीर तांबोळी,जयंती समितीचे अध्यक्ष सुर्यकांत लाटे,महाराष्ट्र विरशैव सभेचे शहराध्यक्ष विशाल आर्वे,रफीक आतार आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

Popular posts from this blog

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव