पंढरी वार्ता:- ईश्वर वठार निवडणूक सरपंचपदी सितादेवी सुभाष माने विजयी मायाक्कादेवी ग्रामिविकास पॅनल 4 तर विरोधी बिरोबा परिवर्तन पॅनलचे 3 उमेदवार विजयी
पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य प्रा.सुभाष माने यांच्या मायाक्कादेवी ग्रामविकास पॅनलच्या सितादेवी सुभाष माने 694 मते घेवून विजयी झाल्या असून एकुण 7 ग्रामपंचायत सदस्यापैकी या पॅनलचे 4 तर विरोधी बिरोबा परिवर्तन पॅनलचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत.प्रा.सुभाष माने समर्थकांचे 40 वर्षापासून या ग्रामपंचायतीवर वर्चस्व अबाधीत आहे.गावाच्या विकासासाठी आपण संघटीतपणे व सर्वाना सोबत घेवून काम करीत आल्यानेच आपणावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून सरपंचपदाची संधी गावाने दिली आहे अशी प्रतिक्रिया या विजानंतर सरपंच सितादेवी सुभाष माने यांनी सा.पंढरी वार्ताशी बोलताना दिली आहे.या विजयानंतर ईश्वर वठार येथे फटाकयांच्या आतषबाजीने अक्षरश: दिवाळी साजरी करण्यात आली.
गेल्या 40 वर्षात केवळ एक टर्म वगळता 35 वर्षे सुभाष माने समर्थक पॅनलचे ईश्वर वठार ग्रामपंचायतीवर वर्चस्व राहीले आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत प्रा.सुभाष माने हे विजयी झाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीच्या माद्यमातून विविध विकास कामांचा धडाका सुरु केल्याने त्यांच्या पॅनलचा विजय निश्चित होता अशी खात्री व्यक्त केली जात होती.मा.आमदार सुधाकरपंत परिचारक,आ.बबनदादा शिंदे,आमदार प्रशांत परिचारक,जि.प.अध्यक्ष संजय शिंदे, युटोपीयन साखर कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करीत असलेल्या विविध विकास कामांमुळेच आमच्यावर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे अशी प्रतिक्रिया यावेळी जि.प.सदस्य प्रा.सुभाष माने यांनी व्यक्त केली आहे.
या निवडणूकीतील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते.
1) सरपंच- सितादेवी सुभाष माने 694.
2) नवनाथ कुंडलीक देवकते (माने गट)245
3) पदमिनी अंकुश चौगुले (आघाडी) 239
4) विजयसिंह वामनराव माने (माने गट)227.
5) मिनाक्षी बाळासाहेब खांडेकर(आघाडी) 207.
6) ज्ञानेश्वर महादेव धुपे 233.(आघाडी)
7) अश्विनी महेश सरवदे (माने गट)231.
8) सुवर्णा दिनकर पाटील(माने गट) 234.