पंढरी वार्ता:- पंढरीत साकारणार 4 कोटी 4 लाख खर्चाचे तुळशीवन ! अखेर कामास सुरुवात झाल्यानंतर दिली गेली माहीती
येथील यशवंतराव चव्हाण जलायशयाच्या ठिकाणी प्रस्तावीत तुळशीवनाच्या कामास धडाक्यात सुरुवात झाली असून या कामास पंढरपूर शहरातीन अनेक सामाजिक संघटनांनी आक्रोशपत्राद्वारे विरोध दर्शविला होता.शहरातील स्वच्छतेची व नागरिकांच्या आरोग्यावर थेट दुष्परणीणाम करणार्या समस्या आधी सोडविल्या जाव्यात अशीच या संघटनांची मागणीॅ होती.तर नमामी चंद्रभागा अभियानाअर्तंगत तुळशी वृंदावनाचे काम केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 2016 च्या आषाढी यात्रेवेळी या कामाचे भुुमीपूजनही झाले होते.आणि मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी लावलेले तुळशीचे रोपटे पेव्हर ब्लॉक च्या आडोशात कसे बसे निसर्गाच्या कृपने तग धरुन वाढत होते.या तुळशीवनाच्या कामास केव्हा सुरुवात होणार असा प्रश्न पंढरपूरकांना पडला असतानाच आता मोठया धडाक्याने हे काम सरु करण्यात आले आहे.मात्र या कामाच्या निविदा प्रसिध्द झाल्यानंतर संकल्पचित्रासह आयटेम वाईज इस्टिमेटची प्रत मिळावी यासाठी सोलापूरचे विभागीय वन अधिकारी श्री माळी यांच्याशी वारंवार संपर्क करण्यात येत होता.मात्र माहीती देण्याबाबत एकवाक्यता दिसून आली नाही.या दरम्यान श्री माळी हे अनेकवेळा या कामाच्या ठिकाणी भेटीसाठी आले मात्र येथील पत्रकारांशी संपर्क करुन माहीती द्यावी या केलेल्या विनंतीस मान देण्यासाठी त्यांच्याकडे वेळही नव्हता.
अखेर पंढरपूरचे उपवनअधिकारी श्री कुलकर्णी यांच्याकडून आज पंढरी वार्तास माहीती मिळाली आहे.या नुसार या तुळशीवनासाठी 1) रिटेनिंग वॉल बांधणे 53 लाख 32 हजार. 2) पुढील बाजुची,मागील बाजुची व उजव्या बाजुचे कंपाऊंड भींत बांधणे 42 लाख 52 हजार.3) मुरुम भराव करणे 2 लाख 88 हजार.4) गवत काढणे 2 लाख 7 हजार.5) डाव्या बाजुची कंपाउंड वॉल बांधणे 38 लाख 22 हजार.6) पेव्हर ब्लॉक टाकणे 41 लाख रुपये. 6) स्टोअर रुम बांधणे 2 लाख 98 हजार. 7) आकर्षक कारंजे बांधणे 19 लाख 32 हजार. 8) 1 नग टॉयलेट ब्लॉक बांधणे 8 लाख 62 हजार. 9) प्रवेशद्वार,गार्डरुम आणि टिकीट खिडकी बांधणे 9 लाख 66 हजार. 10) 8 छोटी मंदीरे उभारणे आणि त्यावर आकर्षक छत्री बसवणे 1 कोटी 8 लाख. 11 ) या ठिकाणी येणार्या नागरिकांसाठी बाकडे 2 लाख 99 हजार. 12) लॅन्ड्स्केप आणि हॉर्टीकल्चर 70 लाख 10 हजार अशा प्रकारे या कामावर एकुण 4 कोटी 4 लाख 3 हजार रुपये खर्च केला जाणार असल्याची माहीती श्री कुलकर्णी यांनी पंढरीवार्तास दिली आहे.