पंढरी वार्ता :- ‘एम्पलॉयमेंट एक्स्चेंज’मधील सुशिक्षीत बेकारांच्या नोंदणीचे पुढे काय ? आ.भारत भालकेंचा सवाल !
राज्य भरात पुर्वीच्या एम्पलॉयमेंट एक्सचेंज म्हणजेच आताच्या कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राकडे राज्यभरातून 25 लाख पेक्षा जास्त बेरोजगार सुशिक्षीत युवकांनी नोंदणी केली आहे.मात्र या केंद्रांकडून याबाबत कुठलीही कार्यवाही केली जात नाही.या सुशिक्षीत व बेकार युवकांनी नोंदणी केल्यानंतर वर्षानुवर्षे या केंदांकडून या बेरोजगारांशी साधा संपर्क करण्याचेही दायीत्व पार पाडले जात नाही.राज्यात बेकारीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत असताना शासनाच्या या विभागाचा कारभार हा केवळ कर्मचारी पोसण्यापुरताच सुरु असल्याचा टिका आ.भारत भालकेंनी सा.पंढरी वार्ताशी बोलताना केली आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत आ.भालकें व इतर चार आमदारांनी एकत्रीत रित्या या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला असून यास उत्तर देताना ना.संभाजी पाटील निलंगेकर यांनी राज्य रोजगार विनिमय केंद्रांकडे 34 लाख 42 हजार 480 बेरोजगारांची नोंद असल्याचे सांगत या बेरोजगारांना रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन,समुपदेशन अशा माध्यमातून बेकारी नष्ट करण्याचे प्रयत्न या केंद्राच्या माध्यमातून केले जात असल्याची माहीती दिली आहे.