पंढरी वार्ता:- दूर दरवाढ नाकारणार्‍या दुध संघांवर कारवाईच्या मागणीसाठी बळीराजाचा रस्ता रोको

राज्याचे दुग्धविकास मंत्री ना.महादेव जानकर यांनी गेल्या चार महिन्यापासून दूर दरवाढ नाकारणार्‍या दुध संघावर कारवाई करण्याचा इशारा देण्याशिवाय कुठलीही कारवाई केली नाही.शासनाने जून महिन्यात दूर दरवाढ जाहीर करुनही प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या पदरात शासनाने केलेली अत्यल्प दरवाढही पडली नाही.हा शासनाचा नाकर्तेपणा असून शासन दूधदरवाढ नाकारणार्‍या संघावर कारवाई करण्यास कुचराई करत आहे.शासनाच्या या धोरणाच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पिलीव चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी बळीराजा शेतकी संघटनेच्या वतीने दूधदरवाढीबरोबरच महावितरणच्या वतीने सद्या वीज कनेक्शन तोडण्याची हाती घेतलेली मोहीम थांबवावी,ज्या भागातील डि.पी.उतरवले गेले आहेत तेेथील डि.पी.त्वरीत पुर्ववत सुरु करावेत अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.
             या रस्ता रोको आंदोलनात बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर,जयंत बगाडे सर,बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर,जिल्हा उपाध्यक्ष शहाजहानभाई शेख,पंढरपूर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जवळेकर,माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर,धनाजी मदने,तानाजी सोनवले,दत्ता ताकभाते,मा.सरपंच अमोल मदने,रमेश पाटील,मोहसिन शेख,अनिल सोनवले आदीसह या या आंदोलनास पाठींबा व्यक्त करण्यासाठी शिवसेना प्रणित युवासेनेचे स्वप्निल वाघमारे हे उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव