पंढरी वार्ता:- दिड वर्षापुर्वी पंढरीत दारु बंदीची मागणी केलेले खा.अमर साबळे यांचा पंढरपूर दौरा ! तिर्थक्षेत्र पंढरी दारुमुक्त करण्याचा आश्‍वासनाचा पडला विसर ?

सुशासन दिनाच्या निमित्ताने खा.अमर साबळे हे शनिवारी पंढरीत दाखल होत असून त्यांच्या आगमनाच्या पाश्‍वभुमीवर पंढरपूर शहर व आसपासच्या काही अवैध दारु विक्रीच्या ठिकाणावर गुरुवारी छापा मारण्याची कारवाई झाली असल्याचीही चर्चा पंढरपूर शहरात रंगली आहे.मा.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुशासन दिनानिमित्त ते व्याख्यान देणार आहेत.मात्र त्यांच्या पंढरपूर दौर्‍यानिमित्त त्यांनी जून 2016 मध्ये केलेल्या पंढरपूर दौर्‍यात येथील शासकिय विश्रामगृहात घेतलेली पत्रकार परिषद व या पत्रकार परिषदेत पंढरपूर तिर्थक्षेत्रात दारुबंदी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी दिलेले आश्‍वासन आणि पुढे या आश्‍वासनाचाच नाहीतर पंढरपूरचा खा.अमर साबळेंना पडलेला विसर याचीच चर्चा त्यांच्या उद्याच्या पंढरपूर दौर्‍यानिमित्त शहर व तालुक्यात होत आहे.
               उद्या खा.अमर साबळे हे येथे सुशासनाचे महत्व सांगणार असले तरी पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेच्या प्रशासनाकडून सुशासनाच्या अपेक्षा जवळपास संपुष्टात आलेल्या आहेत.भारतीय जनता पक्षाचे संसदेत प्रतिनिधीत्व करणारे खासदार ऍड.शहद बनसोडे हे पंढरपूर शहराच्या कुठल्याच महत्वपुर्ण प्रश्‍नाबाबत बोलत नसतानाच राज्यसभेचे खासदार असलेल्या खा.अमर साबळे यांनी पंढरपूर शहरात दारुबंदीचा प्रश्‍न उचलून येथील जनतेमध्ये आपुलकीचे व अपेक्षेचे वातावरण निर्माण केले होते.मात्र ही घोषणा केल्यानंतर येथीलच काही दारु विक्रेत्याबरोबर त्यांचे शासकिय विश्रामगृहाच्या पायर्‍यावर उभारुन फोटो प्रकाशीत झाल्यानंतर शहरात दारुबंदीची मागणी ही फार्स तर नाही ना? अशीच शंका काही सुजाण नागरिक व्यक्त करीत होते.आणि पुढे खा.साबळेंनी या बाबत संपुर्ण मौन बाळगल्याने हा विषय अधिकच संशयाच्या भोवर्‍यात सापडला होता.उद्या सुशासन दिनानिमित्त आल्यानंतर खा.साबळे दारुबंदी  या विषयावर काय बोलतात याकडे सर्वसामान्य पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.  

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव