पंढरी वार्ता :- स्वस्त धान्य दुकानादारांची साखर देण्यास टाळाटाळ ! शिवबुद्ध युवा प्रतिष्ठानचे धरणे आंदोलन



गेल्या साह ते साथ महिन्यापासून पंढरपूर शहर व तालुक्यातील रेशन दुकानदार कार्ड धारकांना साखर वाटप करीत नाहीत कार्डधारकांनी साखरेची मागणी केली तर साखर बंद झाली आहे अशी माहिती दिली जाते .शहर व तालुक्यातील सर्व रेशन दुकानधारकाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी 16/10/2017रोजी केली होती तरी पुरवठा अधिकारी यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही म्हणून शिवबुध्द'युवा'प्रतिष्ठान'महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे . 
     आज सकाळ पासून सुरु असलेल्या या धरणे आंदोलनास अनेक संघटनांनी पाठिंबा व्यक्त केला असून कॉग्रेसचे शहराद्यक्ष राजेश भादुले यांनी याबाबत आंदोलनाच्या ठिकानीं भेट देऊन कारवाईची मागणी केली असल्याची माहिती संदीप मुटकुळे यांनी दिली आहे     

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव