पंढरी वार्ता :- अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक रस्ता कॉक्रिटीकरण कामाच्या दर्जाची चौकशी करण्याची महर्षी वाल्मिकी संघ विद्यार्थी आघाडीची मागणी !

अर्बन बँक ते अंबाबाई पटांगण रस्त्याच्या कॉंक्रटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे व चुकीच्या पध्दतीने होत असून हा रस्ता रुंदीकरण करतानाही मोठा भेदभाव करण्यात आला आहे.या रस्त्याचे काम सुरु होऊन चार महिन्याचा कालावधी लोटला असूनही हे काम आजतागाय रखडलेलेच दिसून येते.या बाबत आम्ही यापुर्वीही पंढरपूर नगर पालीका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.तेव्हा हे गतीने व  दर्जेदार पद्दतीने केले जाईल असे आश्‍वासन देण्यात आले होते.मात्र तरीही हे काम मनमानी पध्दतीने केले जात असून अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे.शासन पंढरपूर शहराच्या विकासासाठी कोटयावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देत असताना केवळ प्रशासनाच्या गलथान काराभारामुळे ठेकेदाराकडून हे निकृष्ट पध्दतीने केले जात आहे.तरी या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी व कामाच्या दर्जाची बाह्य यंत्रणे द्वारे तपासणी केलीॅ जावी अशा आशयाचे निवेदन महर्षी वाल्मिकी संघ विद्यार्थी आघाडीच्या वतीने पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयात  निवेदन  दिले आहे.
                 अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक या रस्त्याचे काम सुरुवातीपासूनच वादाच्या भोवर्‍यात सापडले असून या निवेदनानंतर आता पंढरपूर नगर पालीका प्रशासन काय भुमीका घेणार याकडे या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.हे निवेदन देताना श्रीकांत कांबळे,सचिन सर्जे,अक्षय म्हेत्रे,महेश मेहेर,उमेश मस्तूद,योगेश भोपळे,निलेश भोपळे,सुरज राठी,प्रशांत होनकेरी,सागर डोंगरे आदी उपस्थित होते.    

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव