पंढरी वार्ता:-चंद्रभागेच्या वाळवंटात दारुडयांच्या पार्ट्या ! आ.भालकेंनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्‍न

माझे माहेर पंढरी आणि माझी बहीण चंद्रभागा ही तमाम महाराष्ट्रातील वारकरी भाविकांची श्रध्दा आहे.येथे आल्यानंतर चंद्रभागेचे स्नान,पुंडलीकाचे दर्शन आणि नंतर सावळ्या विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवण्याच्या ओढीने मंदीराकडे प्रयाण हा प्रत्येक येथे आल्यानंतरचा दिनक्रम असतो.जाता पंढरीसी सुख वाटे जिवा .. हा अभंग गुणगुणत आलेले हे भाविक मात्र पंढरीत आल्यानंतर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात दारुडयांच्या पार्ट्यां सुुरु असल्याचे पाहून प्रचंड नाराजी व्यक्त करतात.ज्या चंद्रभागेच्या वाळवंटात हजारो वर्षापासून संतांनी विठ्ू नामाचा गजर केला,येथे झालेल्या किर्तनात प्रत्यक्ष परब्रम्ह किर्तनात हेजरी लावत होते.ज्या वाळवंटात संताचे विविध फडातून प्रवचने,किर्तने या माध्यमातून भक्तीपरंपरेची पताका अधिकाधिक उंच झाली डौलाने फडकावली गेली.त्याच चंद्रभागेच्या वाळवंटात टोळक्याटोळक्याने दारु पीत पार्ट्या करीत बसलेले तरुण हे दृश्य येथील वाळवंटात नित्याचे झाल्याने आ.भारत भालके यांनी हा प्रश्‍न थेट विधानसभेत उपस्थित केला आहे.
           चंद्रभागेच्या वाळवंटात काय स्वरुपी पोलीस चौकी व्हावी.याठिकाणी रोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात.त्यांच्या सुरक्षेबरोबरच वाळवंटाचे पावित्र्य राखले जावे यासाठी पोलीस चौकी होणेही गरजेचे आहे.
    आ.भारत भालकेंनी चंद्रभागेच्या वाळवंटात दारुड्यांच्या पार्ट्या चालत असल्याचा प्रश्‍न विधानसभेत उपस्थित केल्यानंतर गृहमंत्री पदाची जबाबदारी संभाळणारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रश्‍नास उत्तर देताना या ठिकाणी कायम स्वरुपी पेट्रोलींग करण्यासाठी  पोलीस कर्मचारी नेमूण कारवाई करण्याच्या संबधीत अधिकार्‍यांना दिल्या असल्याची माहीती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव