पंढरी वार्ता:- काही राजकीय व सामाजिक संघटनांच्या अपप्रचाराला बळी पडू नका ! नगराध्यक्षा साधना भोसले यांचे आवाहन
पंढरपूर शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे.या निधीतून पंढरपूर शहरात 185 कोटी रुपयांची कामे पुर्णत्वास आली आहेत.तर काही कामे सुरु आहेत.सदर बहुतांशी कामे ही पुणे विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरु आहेत.असे असताना केवळ राजकीय आकसापोटी पंढरपूर नगर पालीकेतील सत्ताधार्यांना टार्गेट करुन काही सामाजिक व राजकीय संघटना 200 कोटींचा धुराळा झाला अशा प्रकारचे आरोप करीत आहेत.वास्तविक पाहता ही कामे पुर्णत्वास आल्यानंतर पंढरपूर शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे.आ.प्रशांतराव परिचारक हे विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला पाहीजे व कामे दर्जेदार झाले पाहीजेत यासाठी स्वत: प्रयत्नशील आहेत असे असताना सद्या शहरात जे अपप्रचाराची मोहीम राबविण्यात येत आहे ती केवळ राजकीयब आकसापोटी आहे.सोशल मिडीया व इतर माध्यमातून सुरु असलेला अपप्रचार खेदजनक आहे अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा साधना भोसले यांनी दिली आहे.

