पंढरी वार्ता :-जॅकवेलसह अनेक प्रश्न प्रलंबीत,जिवन प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष ! सभापती विक्रम शिरसट यांचा आरोप
पंढरपूर शहरासाठी राबविण्यात आलेल्या सुधारीत पाणी पुरवठा योजनतेतील 170 एच.पी.जॅकवेल मध्ये वारंवार चिंध्या,कपडे तसेच इतर टाकावू वस्ते अडकत असल्याने पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात अडथळा येत आहे. या ठिकाणी पुरेशा उंचीची शिडीही संबधीत काम पुर्ण करताना बसविण्यात आली नाही त्यामुळे जीव धोक्यात घालून पाणी पुरवठा विभागाकडे कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना काम करावे लागत आहे.या बाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबधीत अधिकार्यांना वारंवार माहीती देवूनही ते अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत.उद्या या ठिकाणी काही दुर्घटना झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाची राहील असा इशारा पंढरपूर नगर पालीका पाणी पुरवठा समितीचे सभापती विक्रम शिरसट यांनी दिला आहे.
या बाबत अधिक माहीती देताना श्री शिरसट म्हणाले की,पंढरपूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून शहरासाठी 24 कोटी रुपये खर्चाची सूधारीत पाणी पुरवठा योजना शासनाकडून मंजूर करण्यात आली.या योजनेचे का महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले.मात्र हे काम पुर्ण करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने अनेक महत्वपुर्ण बाबी दुर्लक्षीर राहील्या आहेत.पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यासाठी जॅकवेलची वारंवार स्वच्छता करणे गरजेचे असते.या जॅकवेलची खोली आणि प्रत्यक्ष बसविण्यात आलेल्या शिडीची उंची यामध्ये मोठी विसंगती आहे.कर्मचार्याना साफसफाईसाठी आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.त्याच बरोबर या ठिकाणी असललेले पॅनल रुमही खचलेले असून धोकादायक असवस्थेत आहे.उद्या काही धोका उदभवल्यास पंढरपूर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधुनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वांरवार या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विक्रम शिरसट यांनी केला आहे.

