पंढरी वार्ता:- फक्त दारु पिण्याचे परमीट वाटपाची उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी ?

नववर्षाचे स्वागत करण्याच्या हेतूने राज्यभरात अक्षरश: दारुचा महापुर येणार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच बारपरमीट रुम,धाबे,हॉटेल्स अक्षरश: ओसंडून वाहणार आहेत.तर नवीन वर्षाचे स्वागत ‘झिंगाट’ होऊन करण्याच्या आपल्या परंपरेप्रमाणे अनेकजण उद्याच्या पार्टीच्या तयारीला लागले असतानाच दारु पिण्याचे परमीट उपलब्ध करुन देण्याचे प्रसिध्दी करण देवून राज्य उत्पादन शुल्कच्या सोलापूर विभागानेही आपली जबाबदारी पार पाडली आहे.मात्र जिल्ह्यात प्रत्यक्षात वितरीत झालेले परमीट आणि उद्या 31 डिसेंबरच्या रात्री तर्राट होऊन नवीन वर्षाचे स्वागत करणार्‍यांची संख्या यामध्ये यापुर्वीही मोठी तफावत दिसून आली असून उद्या तेच चित्र पंढरपूर तालुक्यातही पहावयास मिळणार आहे.मात्र परमीट व्यतीरिक्त दारु पिणार्‍यांवर प्रत्यक्षात खरी कारवाई ही पोलीसांनाच करावी लागत असून या बाबत कारवाईचे अधिकार असलेले उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उद्या प्रत्यक्षात कारवाई करुन शहर व परिसरातील अवैध रित्या दारु विक्री करणार्‍या अथवा पिण्यार्‍यांवर कारवाई करणार का असाच प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
      उत्पादन शुल्क विभागाने काही वर्षापुर्वी बार परमीट रुम या ठिकाणी तपासणीचे अधिकार पोलीसांकडून काढून घेतले तर आता एफ.एल 3 च्या परवान्याचे नुतनीकरण करताना स्थानिक पोलीसांची परवानगी घेण्याचे अधिकारही याच वर्षीच्या ऑक्टोंबर महिन्यात पोलीसांकडून काढून उत्पादन शुल्क विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत.खरे तर हे पोलीस खात्याच्या अधिकार क्षेत्रावर फार मोठे अतिक्रमण आहे.मात्र शासनाचाच आदेश असल्याने पोलीस खात्यानेही या बाबत हरकत घेतली नाही.पंढरपूर शहर व तालुक्यात मोठया प्रमाणात धाबे व इतर हॉटेल च्या ठिकाणी अवैधरित्या दारु विकली जात असल्याबाबतच्या तक्रारी येवू लागल्या होत्या.सा.पंढरी वातानेही याबाबत आवाज उठविला होता.त्याची दखल घेत जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकासह शहर व तालुका पोलीसांनीही शहर व तालुक्यातील अनेक धाबे व हॉटेलच्या ठिकाणी अवैधरित्या दारु विक्री होत असल्याचे अघडकीस आणून कारवाई केली होती.मात्र या बातमीची दखल घेणे उत्पादन शुल्क विभागास उचीत वाटले नव्हते.आता 31 डिसेंबर च्या पार्श्‍वभुमीवर उत्पादन शुल्क विभागाने दारु पिण्यासाठी परमीट घेण्याचे ज्या प्रमाणे आवाहन केले आहे.त्याच प्रमाणे धाबे व हॉटेल्स तसेच सेलिब्रेशन पार्टीच्या ठिकाणी कारवाई करण्याचीही जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव