पंढरी वार्ता :- स्वच्छता ऍपवर शहरातील रोज नव्या तक्रारींंचा ढिगारा ! तातडीने निपटारा करण्याची होत आहे मागणी
स्वच्छतेचा जागर करणार्या स्वच्छता ऍपवर पंढरपूर शहरातील आरोग्य खात्याच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढणारे फोटो मोठया संख्येने पोष्ट होत असून या ऍपवर शहरातील विविध ‘सिटीझन्स’च्या तक्रारींचा ढिगारा साचला असून या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी नगर पालीकेच्या वतीने काय उपाययोजना करण्यात आली याची माहीती मात्र या ऍपवर उपलब्ध होत नसल्याचेच दिसून येत आहे.तक्रार करुन अनेक दिवस उलटले तरीही या बाबत कुठलीच कार्यवाही होत नसल्याची टिकाही विविध ठिकाणच्या घाणीचे व अस्वच्छतेचे फोटो पोस्ट केल्यानंतर नागरिक व्यक्त करीत आहेत.पंढरपूर नगर पालीकेने स्वच्छता ऍपच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या तक्रारींचे तातडीने निराकारण करणे गरजचे झाले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 4 जानेवारी 2018 पासून सुरु होणार्या सर्वेक्षणामध्ये पंढरपूर नगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे. स्वच्छतेच्या ऍपमुळे अस्वच्छ झालेले पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर होण्यास नक्कीच मदत होणार आहे मात्र त्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.