पंढरी वार्ता :- महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला तुळशी अर्चन करून अटलजींना शुभेच्छा
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 95 व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रूक्मिणीला तुळशी अर्चन करण्यात आले.
श्री विठ्ठल-रूक्मिणीला सोमवारी सकाळी पंढरपूर शहर भाजपाच्या वतीने तुळशी अर्चन करून अटलजींना शतायुषी करावे, असे साकडे घालण्यात आले. हा कार्यक्रम अतिशय भावपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष विदुल अधटराव, ओबीसी आघाडी प्रमुख लखन ननवरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष किरण खडाखडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष अक्षय कदम, अनिल शिंदे, आनंद नगरकर, भाजपा वैद्यकीय आघाडी प्रमुख डॉ. शशिकांत धायतडक, सतीश सासवडकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष निलेश चव्हाण, गिरीष आराध्ये, भाजपा शहर उपाध्यक्ष शाम तापडिया, गणेश गोमासे, लखन माळी, महिला आघाडी शहराध्यक्षा अपर्णा तारके, भाजपा शहर सरचिटणीस रेखा कुलकर्णी, मंदिर समिती सदस्या शकुंतला नडगिरे, हर्षदा नगरकर, भाजपा महिला आघाडी उपाध्यक्षा अंजली भोरकर आदी उपस्थित होते.

